१. प्रगतीची पूर्वसूचना मिळणे
‘एक वर्षापूर्वी आम्ही श्री. बदरी नारायण आरवल्ली मामांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांचे छायाचित्र काढले होते; परंतु त्यांची गुणवैशिष्ट्ये लिहून देण्यास आम्हाला उशीर झाला, यासाठी श्री गुरुचरणी क्षमायाचना करतो. मामांची आध्यात्मिक प्रगती झाली असेल, असे ५ – ६ मासांपूर्वीच मला वाटत होते. मागील एक वर्षापासून त्यांच्यामध्ये पुष्कळ पालट झाले आहेत. आता त्यांचा चेहरा अधिक प्रसन्न आणि चैतन्यदायी वाटतो.
२. आमच्या घरी काही विशेष कार्यक्रम किंवा मुहूर्त यांविषयी काही शंका असेल, तर मामा आमचे शंकानिरसन करतात.
३. भगवंताची भक्ती करणे
प्रतिदिन मामांचा दिवसारंभ श्रीमन्नारायणाच्या भक्तीने चालू होतो आणि दिवसाचा शेवटही भगवंताच्या पूजेने होतो. ते संसारात राहून भगवंताची भक्ती, पूजा, मंत्रजप आणि धार्मिक विधी करतात.
४. प्रत्येक प्रसंगात स्थिर आणि आनंदी रहाणारे श्री. श्रीबदरी नारायण अन् पू. आंडाळआजी
मामा आणि पू. आंडाळआजी दोघांनाही जेव्हा त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी सांगितले गेले, तेव्हा ते दोघेही स्थिर होते. ‘त्यांना मायेतील गोष्टींची आसक्ती नाही. त्यांच्या अंतःकरणात भगवंताप्रती भाव, भक्ती आणि भगवंतस्मरण असते. त्यातच त्यांना अधिक आनंद मिळतो’, असे मला वाटते.
गुरुदेवांनी मला सात्त्विक आणि साधना करणार्या कुटुंबियांमध्ये ठेवले आहे. संसारात राहूनही साधनेला पूरक वातावरण दिले आहे. त्यासाठी त्यांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. प्रसन्ना वेंकटापुर, भाग्यनगर (१४.८.२०२३)