सौ. जानकीदेवी माडभूषि (पू. आजींची मुलगी)
१. ‘पू. आंडाळ आरवल्लीआजी यांच्या पोटी जन्म मिळाल्यामुळे जीवन धन्य झाले,’ असे वाटणे
‘१४.९.२०२३ या दिवशी माझी आई पू. आंडाळ आरवल्लीआजी संत झाल्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. मला पू. आईच्या पोटी जन्म मिळाल्यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे. पू. आईच्या संतसन्मान कार्यक्रमाच्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली. पू. आईमध्ये असलेली साधनेची तीव्र तळमळ आणि गुरुदेवांवरील अढळ श्रद्धा यांमुळे ती साधनारत आहे. तिच्याकडून प्रेरणा घेऊन मीसुद्धा साधना वाढवण्याचा प्रयत्न करीन.’
चि. बलराम वेंकटापुर (पू. आजीचा पणतू , वय ६ वर्षे)
‘पू. आंडाळ आरवल्लीआजी संत होणार आणि आजोबांचीही (श्री. श्रीबदरी नारायण आरवल्ली यांची) प्रगती होणार’, अशी मला पूर्वसूचना मिळाली होती.’
श्री. प्रसन्ना वेंकटापुर, भाग्यनगर
१. एकलव्यासारखी साधना करणार्या पू. आंडाळआजी !
‘पू. आजींना साधनेविषयी कुणाचेही मार्गदर्शन मिळाले नाही किंवा कुणाचा सत्संग लाभला नाही; तरीही त्या भगवंताप्रतीची उत्कट श्रद्धा, भाव आणि सतत नामजप करणे यांच्या बळावर साधना करत राहिल्या. त्यांनी जीवनात अनेक कठीण प्रसंग आणि त्रास सहन केले; परंतु कोणत्याही परिस्थितीत त्यांची भगवंतावरची श्रद्धा अल्प झाली नाही. त्या एकलव्याप्रमाणे तळमळीच्या बळावर साधना करून संतपदी पोचू शकल्या.
२. ‘आजींनी संतपद गाठले आहे’, अशी पूर्वसूचना मिळणे
मागील वर्षी पू. आजींची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के होती. काही मासांपूर्वी आमचे पू. आजींशी भ्रमणभाषवरून (‘व्हिडिओ कॉल’ वरून) बोलणे झाले होते. तेव्हा त्यांच्या चेहर्यावर तेज आणि चैतन्य पुष्कळ प्रमाणात दिसत होते. त्यांना पाहिल्यावर ‘त्यांनी संतपद गाठले आहे’, असे ३ – ४ वेळा माझ्या मनात आले होते.
पू. आजी स्थिर राहून आणि चिंता न करता जीवनातील कठीण प्रसंगाला सामोर्या गेल्या. ‘अखंड नामस्मरण करणे, हा एकमात्र सत्मार्ग आहे’, असे पू. आजींनी आम्हाला शिकवले आहे.
संसारात राहून भगवंताच्या अनुसंधानात रहाणारा पू. आजींसारखा उच्च कोटीचा जीव आमच्या कुटुंबात असल्याने आम्ही भाग्यवान आहोत. ‘आम्हाला पू. आजींकडून प्रेरणा घेऊन सातत्याने साधना करता येऊ दे’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १४.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |