मुंबईत घरात काही न मिळाल्‍याने शिरस्‍त्राणाची चोरी !

पोलिसांचा वचक राहिला नसल्‍याचे द्योतक !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – येथील ओशिवरा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील एका घरात चोर शिरले होते; पण त्‍यांना तेथे काहीच न मिळाल्‍याने त्‍यांनी तेथील एका दुचाकीवरील शिरस्‍त्राण चोरले. हे दृश्‍य सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यात दिसत आहे. या प्रकरणी पोलीस अन्‍वेषण करत आहेत. (पोलिसांनी चोरांना फूस न लावता कठोर शिक्षा करून त्‍यांचे कर्तव्‍य पार पाडावे ! – संपादक)