मुंबई – धनगर समाजाला ‘अनुसूचित’ म्हणून दाखला मिळावा आणि त्या आधारे आरक्षण प्राप्त व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने एका अभ्यास समितीची स्थापना केली आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे. ही समिती मध्यप्रदेश, बिहार आणि तेलंगाणा या राज्यांत जाऊन तेथे अनुसूचित जमातींना कोणत्या आधारे आरक्षण देण्यात आले, याचा अभ्यास करणार आहे. ही समिती ३ मासांत सरकारला अहवाल सादर करणार आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रीमंडळाच्या बैठकीत अन्य राज्यांत धनगर समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सरकारने अशा प्रकारच्या अभ्यासगटाची स्थापना केली आहे.