धुळे – येथे २० डिसेंबरला आझाद समाज पार्टीच्या वतीने टिपू सुलतान जयंती साजरी करण्यास पोलिसांनी बंदी घातली. या वेळी त्यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णट घेतल्याचे सांगितले. बंदी घातल्याने पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आणि ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. या वेळी ‘प्रशासनाने टिपू सुलतान यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी’, अशी मागणीही त्यांनी केली. (‘ही मागणी प्रशासनाने कदापि मान्य करू नये’, अशी हिंदूंची अपेक्षा ! – संपादक)
बारामतीमध्ये बजरंग दल आणि हिंदु संघटना यांच्याकडून टिपू सुलतानच्या जयंतीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. यासाठी त्यांनी ठिय्या आंदोलन केले. (राष्ट्रहानी रोखण्यासाठी संघटित होणार्या हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंवर अनन्वित अत्याचार करून त्यांच्या हत्या करणारा आक्रमक टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी आणणे हा धुळे पोलिसांचा योग्य निर्णय ! |