‘साधकांची आध्‍यात्मिक प्रगती व्‍हावी’, यासाठी प्रयत्न करणार्‍या आणि तळमळीने सेवा करणार्‍या ६९ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या मडगाव, गोवा येथील वास्‍तूविशारद (सौ.) शौर्या सुनील मेहता (वय ४७ वर्षे) !

उद्या ‘कार्तिक शुक्‍ल षष्‍ठी, रविवार (१९.११.२०२३) या दिवशी वास्‍तूविशारद (सौ.) शौर्या सुनील मेहता (आध्‍यात्मिक पातळी ६९ टक्‍के) यांचा ४७ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त मला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्येे येथे दिली आहेत.

सौ. शौर्या सुनील मेहता

वास्‍तूविशारद (सौ.) शौर्या सुनील मेहता यांना ४७ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्‍छा !

१. उत्‍साही

शौर्यादीदींकडे आश्रमाच्‍या बांधकामाविषयी काही दायित्‍वाच्‍या सेवा आहेत. त्‍यासाठी त्‍या सकाळी लवकर घरातील सर्व आवरून, ४५ मिनिटांचा प्रवास करून आश्रमात सेवेसाठी येतात. एवढा प्रवास करून आल्‍यावरही त्‍या सतत उत्‍साही असतात. त्‍यांना भेटल्‍यावर किंवा त्‍यांच्‍याशी बोलल्‍यावर आम्‍ही (त्‍यांच्‍या सेवेशी संबंधित साधक) साधकही सकारात्‍मक आणि उत्‍साही होतो.

सुश्री (कु.) स्‍मिता ढगे

२. जवळीक करणे

सर्वांशी सहजतेने जवळीक करण्‍याच्‍या स्‍वभावामुळे त्‍यांनी गोव्‍यातील प्रतिष्‍ठित वास्‍तूविशारद (VIP Architects) आणि स्‍थापत्‍य अभियंते (Civil Engineers) यांना गेल्‍या २ वर्षांपासून सनातन संस्‍थेशी जोडले आहे.

३. आधार वाटणे

दीदींच्‍या बोलक्‍या आणि मोकळ्‍या स्‍वभावामुळे आम्‍हा साधकांना आणि बाहेरचे कंत्राटदार (काँट्रॅक्‍टर) अन् वास्‍तूविशारद यांनाही त्‍यांचा आधार वाटतो.

४. सूक्ष्मातील जाणण्‍याची क्षमता

अ. माझे मन अस्‍थिर असतांना ‘मी कुठल्‍या विचारांमुळे अस्‍थिर आहे’, हे त्‍या त्‍वरित सांगतात.

आ. ‘व्‍यक्‍तीच्‍या चेहर्‍यावरील भाव शुद्ध, सात्त्विक आहेत कि असात्त्विक आहेत’, हे त्‍यांना लगेच कळते.

५. स्‍थिर

त्‍यांचे मन बाह्य गोष्‍टींमुळे विचलीत होत नाही. अर्जुनाप्रमाणे त्‍यांची दृष्‍टी नेहमी गुरुकृपेकडेच असते.

६. ‘साधकांची आध्‍यात्मिक प्रगती व्‍हावी’, यासाठी तत्त्वनिष्‍ठतेने साधकांना चुका सांगून त्‍यांचे स्‍वभावदोष न्‍यून करण्‍यासाठी प्रयत्न करून घेणार्‍या शौर्यादीदी !

दीदी साधकांना आध्‍यात्मिक स्‍तरावर साहाय्‍य करतात. त्‍यामुळे त्‍या साधकांना कठोरपणे चुकांची जाणीव करून देतात आणि त्‍या चुकांमागे असलेले स्‍वभावदोष अन् अहं यांचे चिंतन करायला लावतात. त्‍यावर उपाययोजना काढेपर्यंत त्‍या साधकांचा पाठपुरावा घेतात. दीदी ‘चुकांमुळे साधनेची हानी होत आहे’, हे साधकांच्‍या लक्षात आणून देतात. यामागे ‘आम्‍हा साधकांची आध्‍यात्मिक प्रगती शीघ्र गतीने व्‍हावी’, हीच त्‍यांची इच्‍छा असते. ही त्‍यांची आम्‍हा साधकांप्रती असलेली प्रीतीच आहे.

७. इतरांमध्‍ये पालट घडवण्‍याची क्षमता

दीदींमुळे त्‍यांच्‍या संपर्कातील वास्‍तूविशारद आणि स्‍थापत्‍य अभियंते यांच्‍यात पालट झाला असून तेही स्‍वतःच्‍या चुका सांगून क्षमायाचना करतात आणि आश्रमाशी संबंधित सर्व गोष्‍टींमध्‍ये कार्यपद्धतीचे पालन करतात.

यावरून दीदीने ‘व्‍यवहारातील नातीही आध्‍यात्मिक स्‍तरावर जोडली आहेत’, असे लक्षात येते.

८. भाव

अ. गुरुदेव (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍याविषयी दीदींच्‍या मनात सतत कृतज्ञताभाव असतो.

आ. गुरुदेवांचे मन जिंकण्‍यासाठी त्‍या सतत त्‍यांना अपेक्षित असे वागतात आणि तळमळीने सेवा करतात.

९. प्रार्थना

‘प.पू. डॉक्‍टर, तुम्‍हीच मला शौर्यादीदींचे गुण शिकून ते कृतीत आणण्‍यास साहाय्‍य करावे’, अशी आपल्‍या कोमल चरणी प्रार्थना करते.’

– सुश्री (कु.) स्‍मिता ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.११.२०२३)