संस्‍कृत भाषेचे सौंदर्य !

माणसाचा आदर्श !

आपद़्‍सु न त्‍यजेद़् धैर्यम् संपत्‍सुचन नम्रताम् ॥

अर्थ : संकटे आली असता मनुष्‍याने धैर्य सोडू नये आणि संपत्तीच्‍या म्‍हणजे उत्‍कर्षाच्‍या काळात नम्रता सोडू नये.


वर्तमानकाळात रहा !

गते शोको न कर्तव्‍यो भविष्‍यं नैव चिन्‍तयेत् ।
वर्तमानेन कालेन वर्तयन्‍ति विचक्षणाः ॥

अर्थ : गेल्‍या गोष्‍टींचा शोक करू नये. भविष्‍यकाळाचा विचार करू नये. भविष्‍याची सुखस्‍वप्‍ने रंगवत बसू नये. शहाणी माणसे वर्तमानकाळास धरून योग्‍य असे वर्तन करतात.


सुख आणि दुःख यांत समबुद्धीने रहाणे

उदये सविता रक्‍तो रक्‍तश्‍चास्‍तमये तथा ।
सम्‍पत्तौ च विपत्तौ च महताम् एकरूपता ॥

अर्थ : सूर्य उगवतांना रक्‍तवर्णाचा असतो. तो मावळतांनाही तसाच असतो. त्‍याप्रमाणे सुख आणि दुःख या दोहोंमध्‍ये थोर मनाची माणसे एकसमान असतात.