नवसाक्षरता अभियानावर शिक्षक संघटनांचा बहिष्‍कार !

नवसाक्षरता अभियानातील निरक्षरांच्‍या सर्वेक्षणाचे काम अशैक्षणिक असल्‍याचे सांगत शिक्षक संघटनांनी या कामाला विरोध केला. त्‍यामुळे ८ सप्‍टेंबरपासून या अभियानाचे काम राज्‍यात चालू होऊ शकले नाही.

धर्मशास्‍त्र समजून घेऊन आचरण करा ! – आनंद जाखोटिया, मध्‍यप्रदेश आणि राजस्‍थान समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती

सध्‍या आपण सणांमागील धर्मशास्‍त्र विसरत चाललो आहोत. त्‍यामुळे सणांचे मूळ स्‍वरूप नष्‍ट झाले असून केवळ मनोरंजनासाठीच सण पहावयास मिळत आहेत.

निर्लज्‍ज नितीश !

विधानसभेत अश्‍लील हावभाव करून दायित्‍वशून्‍य विधाने करणारे मुख्‍यमंत्रीपदी असणे, ही लोकशाहीची शोकांतिका !

‘बँक आपल्‍या दारी’ उपक्रमाच्‍या अंतर्गत ४०० लाभार्थ्‍यांना सानुग्रह अनुदान वाटप !

उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्‍या पुढाकाराने निवृत्तीवेतन धारकांची दिवाळी गोड झाली आहे. ‘बँक आपल्‍या दारी’ उपक्रमाच्‍या अंतर्गत ४०० लाभार्थ्‍यांना एकाच ठिकाणी सानुग्रह अनुदान वाटप करण्‍यात आले.

पुणे शहरातील १ सहस्र ८२६ पैकी केवळ २४५ होर्डिंग्‍जचे नूतनीकरण !

विज्ञापनांमुळे कोट्यवधी रुपयांचा लाभ कमावणारी आस्‍थापने सर्व नियम धाब्‍यावर बसवतात, हे लज्‍जास्‍पद ! नियमांचे पालन न करणार्‍या आस्‍थापनांवर कठोर कारवाई करा !

पुणे येथे विनाअनुमती लावलेल्‍या फलकधारकांकडून ५ वर्षांचे शुल्‍क आकारणार ! – उपायुक्‍त माधव जगताप

महापालिकेच्‍या आकाशचिन्‍ह विभागाकडून शहरातील विज्ञापन फलकांची (होर्डिंग) पडताळणी करण्‍यात येणार आहे. जे विनाअनुमती विज्ञापन फलक आहेत त्‍यांना अनुमती देतांना मागील ५ वर्षांचे शुल्‍क वसूल केले जाईल.

कोल्‍हापूर शहरासाठी केंद्र सरकारकडून १०० वातानुकूलित ‘इ-बसगाड्या’ मिळणार ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

केंद्र सरकारच्‍या विशेष समितीकडून ‘पी.एम्. इ-बससेवा’ प्रकल्‍प चालू असून त्‍याअंतर्गत कोल्‍हापूर शहराला १०० वातानुकूलित इ-बसगाड्या संमत करण्‍यात आल्‍या आहेत. ही कोल्‍हापूरला दिवाळी भेट आहे, अशी माहिती राज्‍यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगली जिल्‍ह्यातील ४ तालुक्‍यांत मध्‍यम स्‍वरूपाचा दुष्‍काळ घोषित !

सांगली जिल्‍ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा, मिरज या ४ तालुक्‍यांमध्‍ये मध्‍यम स्‍वरूपाचा दुष्‍काळ घोषित केला आहे. या तालुक्‍यात शासनाने संमत केलेल्‍या विविध सवलती लागू करण्‍याविषयीचा आदेश जिल्‍हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निर्गमित केला आहे.

असे संपूर्ण देशात करून मंदिरे सरकारीकरणमुक्‍त करावीत !

‘आम्‍ही तमिळनाडूत सत्तेत येताच राज्‍यांतील सहस्र मंदिरांचे सरकारीकरण करणारे  ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी मंत्रालय’ रहित करू’, असे आश्‍वासन भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्‍यक्ष के. अण्‍णामलाई यांनी दिले.

धन्‍वन्‍तरिदेवतेचा उत्‍सव !

धन्‍वन्‍तरिदेवता समुद्रमंथनातून प्रकट झाली, ती अमृतकुंभ घेऊनच ! धन्‍वन्‍तरीच्‍या प्रकटनामुळे मृत्‍यूवर मात करून अमरत्‍वाचा लाभ मिळवण्‍याचा ऋषिमुनी आणि देवता यांचा प्रयत्न यशस्‍वी झाला.