
सांगली – सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा, मिरज या ४ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित केला आहे. या तालुक्यात शासनाने संमत केलेल्या विविध सवलती लागू करण्याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निर्गमित केला आहे. हा आदेश ३१ ऑक्टोबर ते पुढील ६ मास लागू असेल. या आदेशात जमीन महसूलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजदेयकात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफीे यांसारख्या अन्य सवलती लागू करण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
घरपट्टीच्या नोटिसीतील जाचक अटी आणि कालमर्यादा रहित करावी ! – ‘व्यापारी एकता असोसिएशन’ची मागणी
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक