
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने निवृत्तीवेतन धारकांची दिवाळी गोड झाली आहे. ‘बँक आपल्या दारी’ उपक्रमाच्या अंतर्गत ४०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. यात संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी अशा शासनाच्या विविध योजनांचे सानुग्रह अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले. या प्रसंगी सर्व वृद्धांनी श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराविषयी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी सर्वश्री अजित चव्हाण, केरबा माने, सुनील केसरकर, मिलींद प्रभावळकर यांसह अन्य उपस्थित होते.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे