दावोस दौर्‍याचा खर्च ३२ कोटी ! – उद्योगमंत्री उदय सामंत

दावोस दौर्‍यात ४० कोटी रुपयांचा खर्च झाल्‍याचा आरोप खोटा असून या दौर्‍यात ३२ कोटी रुपये खर्च आला, अशी माहिती राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या दौर्‍यामध्‍ये १ लाख ३७ सहस्र कोटींचे १९ सामंजस्‍य करार झाले असून त्‍यामुळे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.

पुणे जिल्‍हा परिषदेने केलेल्‍या माध्‍यमिक शाळांच्‍या मूल्‍यांकनामध्‍ये ६१३ शाळा ‘नापास’ !

शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुण्‍यात शेकडो शाळा मूल्‍यांकनामध्‍ये अनुत्तीर्ण होणे, हे शिक्षण विभागाला लज्‍जास्‍पद !

कोल्‍हापुरातील जिल्‍हा क्रीडा अधिकार्‍याला १ लाख १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

भ्रष्‍टाचारग्रस्‍त भारत ! अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्‍त करून त्‍यांना अद्दल घडेल, अशी शिक्षा दिल्‍याविना लाचखोरीला आळा बसणार नाही !

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्‍ये ‘लेझर’ प्रकाशामुळे २३ वर्षीय तरुणाची दृष्‍टी अधू झाली !

‘लेझर लाईट’ ५ मिलीवॅटपेक्षा अधिक होती. ती मनुष्‍याच्‍या डोळ्‍यांवर १० सेकंदासाठी जरी प्रकाशित झाली, तरी त्‍याचा ‘रेटिना’वर परिणाम होऊ शकतो.

नागपूर येथील सुपारी व्‍यापार्‍याचे अपहरण करून अमानुष छळ !

अपहरणकर्त्‍यांनी नानक यांना नंदुरबार येथे लपवून ठेवले होते. पीडित नानक अपहरणकर्त्‍याच्‍या तावडीतून कसेबसे सुटले.आरोपींनी त्‍यांना बंदी बनवून त्‍याच्‍या सर्वांगावर सिगारेटचे चटके दिले आहेत.

पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत ३२९ रुपयांहून अधिक !

या व्यतिरिक्त घरगुती सिलिंडरची किंमतही २४६ रुपयांनी वाढल्याने सिलिंडरची किंमत ३ सहस्र ७९ रुपये झाली आहे. 

नेपाळमध्ये गोमांस खाण्याच्या संदर्भातील व्हिडिओवरून हिंसाचार !

आता हिंदूबहुल नेपाळमध्येही धर्मांधांकडून गोहत्या आणि गोमांस यांच्या संदर्भातील घटना घडत आहेत. याला नेपाळमधील हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करून त्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे !

आपचे खासदार संजय सिंह यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक  

अबकारी धोरणाच्या संदर्भात ही धाड घालण्यात आली होती. अबकारी धोरण प्रकरणाच्या आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव आहे.

आसाममध्ये बालविवाहाच्या विरोधात कारवाई चालू : १ सहस्र ३९ लोकांना अटक !

बालविवाहासारख्या सामाजिक अपप्रकारांच्या विरोधात आसाम शासनाप्रमाणेच अन्य सरकारांनीही प्रयत्न केले पाहिजेत !

(म्हणे) ‘कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी अल्पसंख्यांकांना १० सहस्र कोटी रुपयांपर्यंत अनुदान देणार !’ – सिद्धरामय्या

बहुसंख्य हिंदूंनी कर रूपाने भरलेला पैसा अन्य धर्मियांवर केवळ मतांच्या लांगूलचालनासाठी त्यांच्यावर उधळणार्‍या काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?