पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत ३२९ रुपयांहून अधिक !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्‍या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला ३ अब्ज डॉलरचे साहाय्य करतांना काही अटी घातल्या होत्या. या अटींची पूर्तता करण्यात येत असल्याने पाकिस्तानात महागाई वाढली आहे. अटींमध्ये पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती वाढवण्याचीही अट होती. त्यामुळे सरकारने सातत्याने इंधन दरांत वाढ केली. पेट्रोलची किंमत ३३१ रुपये झाली आहे, तर डिझेलची किंमत ३२९ रुपयांनी विकले जात आहे.

तसेच पाणी आणि वीज देयके यांच्या किमतीत २९.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे महागाईच्या दरांतही वाढ झाली. या व्यतिरिक्त घरगुती सिलिंडरची किंमतही २४६ रुपयांनी वाढल्याने सिलिंडरची किंमत ३ सहस्र ७९ रुपये झाली आहे.