(म्हणे) ‘कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी अल्पसंख्यांकांना १० सहस्र कोटी रुपयांपर्यंत अनुदान देणार !’ – सिद्धरामय्या

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा !

काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – अल्पसंख्यांकांना ४०० कोटी रुपये असलेले अनुदान मी ३ सहस्र कोटी रुपये इतके अधिक केले आहे. पुढील वर्षीही अनुदान अधिक वाढवून देईन. माझ्या अधिकाराचा अवधी संपेपर्यंत १० सहस्र कोटी रुपये अनुदान देईन, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषित केले आहे. ते एका भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते.

‘राज्यात आम्ही सर्व समुदायाच्या उत्कर्षासाठी काम करतो. राज्याची संपत्ती सर्वांना मिळाली पाहिजे’, असेही ते या वेळी म्हणाले. (याला म्हणतात ढोंगीपणा ! भारत धर्मनिरपेक्ष असतांना धर्माच्या आधारे मतांसाठी एका धर्माला कुरवाळणारे हिंदूंसाठी काय करतात ? हे त्यांनी सांगितले पाहिजे ! – संपादक)

(म्हणे) ‘मुसलमानांना ३ मंत्रीपदे द्या !’ – सय्यद महंमद बॅरी

बॅरी असोसिएशनचे अध्यक्ष सैयद महंमद बॅरी या वेळी म्हणाले की, सरकारची स्थापना होण्यामध्ये मुसलमानांची भूमिका मोठी  आहे. अजून न्यूनतम ३ मंत्रीपदे मुसलमानांना देण्यात यावी. आमचे यू.टी. खादर यांना मंत्री बनवले पाहिजे, अशी मागणी केली.

संपादकीय भूमिका

  • राज्यातील किती अल्पसंख्यांक कर भरतात ? हे सिद्धरामय्या जनतेला सांगू शकतील का ?
  • बहुसंख्य हिंदूंनी कर रूपाने भरलेला पैसा अन्य धर्मियांवर केवळ मतांच्या लांगूलचालनासाठी त्यांच्यावर उधळणार्‍या काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?