आपचे खासदार संजय सिंह यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक  

आपचे खासदार संजय सिंह

नवी देहली – देहलीतील आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने सकाळी धाड घालून त्यांना अटक केली. अबकारी धोरणाच्या संदर्भात ही धाड घालण्यात आली होती.

अबकारी धोरण प्रकरणाच्या आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव आहे. या आरोपपत्रात संजय सिंह यांच्यावर अवैधरित्या ८२ लाख रुपयांच्या देणग्या घेतल्याचा आरोप आहे. यासंदर्भात पथकाने त्यांच्या घरी पोचून त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली.