१०० नागरिकांचा मृत्यू, तर ९०० हून अधिक घायाळ
प्रत्युरादाखल इस्रायलच्या वायूदलाकडूनही पॅलेस्टाईनवर आक्रमण
जेरुसलेम (इस्रायल) – पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात युद्धास आरंभ झाला. पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना ‘हमास’ने इस्रायलची राजधानी तेल अविव, सडेरोट अश्कलोन आणि अन्य अशा ७ शहरांवर अवघ्या २० मिनिटांत ५ सहस्र रॉकेट डागल्यानंतर इस्रालयाने युद्धाची घोषणा करत प्रत्युत्तरादाखल पॅलेस्टाईनवर आक्रमण चालू केले. इस्रायलच्या वायूदलाने पॅलेस्टाईनमध्ये घुसून बाँबवर्षांव चालू केला. हमासच्या आक्रमणात इस्रायलच्या १०० नागरिकांचा मृत्यू, तर ९०० हून अधिक जण घायाळ झाल्याचे सांगितले जात आहे. हे रॉकेट निवासी इमारतींवर पडल्याने ही हानी झाली. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या ३५ नागरिकांना पकडल्याचा दावा, तसेच इस्रायलच्या काही भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावाही हमासने केला आहे.
सौजन्य: Republic Bharat
हमासने अधिकृतपणे या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. ‘इस्रायलविरुद्ध सैनिकी कारवाई करण्यात येत आहे’, असे हमासचा नेता महंमद डेफ याने म्हटले आहे. या कारवाईला ‘ऑपरेशन अल्-अक्सा स्टॉर्म’ असे नाव देण्यात आले आहे. ‘आता फार झाले. आम्ही सगळ्या पॅलेस्टिनींना इस्रायलचा सामना करण्याचे आवाहन करतो’, असे डेफ म्हणाला. इस्रायलने अनेकदा डेफ याला मारण्याचा प्रयत्न केला; पण प्रत्येक वेळी तो वाचला.
हमासला याची मोठी किंमत चुकवावी लागेल ! – इस्रायल
इस्रायलच्या सैन्यानेही युद्धासाठी सिद्ध असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी विशेष बैठक बोलावून संबंधितांशी चर्चा केली. ‘इस्रायलच्या नागरिकांनो, हे युद्ध आहे आणि आपण ते नक्कीच जिंकू. याची किंमत शत्रूला चुकवावी लागेल’, अशी चेतावणी पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी दिली आहे.
#WATCH हम युद्ध में हैं, किसी ऑपरेशन या राउंड में नहीं। आज सुबह हमास ने इज़राइल और उसके नागरिकों पर एक जानलेवा हमला किया…दुश्मन को इसकी कीमत चुकानी पड़ेगी…हम युद्ध में हैं और हम इसे जीतेंगे: इज़राइल के प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू
(वीडियो सौजन्य: इज़राइल के प्रधानमंत्री… pic.twitter.com/NLw1q7hB5e
— ANI_HindiNews (@AHindinews) October 7, 2023
इस्रायलच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह !
इस्रायलमध्ये क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा कार्यरत असतांना अशा प्रकारचे आक्रमण झालेच कसे ?, तसेच सीमेमध्ये घुसून हमासने इस्रायलच्या नागरिकांना पकडून नेतो, त्यावेळी इस्रायलचे सैनिक सीमेवर नव्हते का ?, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काय आहे वाद ?गेल्या १०० वर्षांपासून येथील वेस्ट बँक, गाझा पट्टी आणि गोलन हाइट्स या भागांवरून वाद चालू आहे. पूर्व जेरुसलेमसह या भागांवर पॅलेस्टाईनचा दावा आहे. त्याच वेळी इस्रायल जेरुसलेमवर दावा करत आहे. गाझा पट्टी इस्रायल आणि इजिप्त यांच्या मध्ये आहे. हे ठिकाण सध्या हमासच्या कह्यात आहे. ‘हमास’ हा पॅलेस्टाईनमधील इस्रायलविरोधी गट आहे. सप्टेंबर २००५ मध्ये इस्रायलने गाझा पट्टीतून त्याचे सैन्य मागे घेतले. वर्ष २००७ मध्ये इस्रायलने या भागावर अनेक निर्बंध लादले होते. ‘वेस्ट बँक आणि गाझा पट्टी यांमध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्य स्थापन करावे’, असे पॅलेस्टाईनचे म्हणणे आहे. |