भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेकडून चीनच्या गुप्तहेर नौकेला तिच्या बंदरावर येण्यास अनुमती !

भारत ज्या देशांना साहाय्य करतो, त्यांतील बहुतेक देश भारताचा विश्‍वासघात करतात, असेच दिसून येते. यावरून भारताने कुणाला साहाय्य करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे !

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवणार्‍या मुसलमान तरुणाला अटक

कर्नाटकच्या होसपेट शहरात पॅलेस्टाईनचे समर्थन केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आलम पाशा या २० वर्षांच्या तरुणाला अटक केली. त्याने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवले होते.

अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार करणार्‍या पित्याला आजन्म कारावासाची शिक्षा !

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याच्या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने तिच्या वडिलांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासह १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असतांना ही घटना घडली होती.

चीनमधील इस्रायलच्या राजनैतिक अधिकार्‍यावर जीवघेणे आक्रमण !

याआधी इजिप्तमध्येही इस्रायली पर्यटकांवर झालेल्या आक्रमणात २ इस्रायली ठार झाले होते !

उत्तर गाझामधील लोकांना २४ घंट्यांत दक्षिण गाझामध्ये जाण्याचा आदेश !

इस्रायलने गाझा पट्टीतील उत्तर भागातील ११ लाख मुसलमानांना २४ घंट्यांत तेथून दक्षिण भागात जाण्याचा आदेश दिला आहे. यामुळे गाझा पट्टीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची मुदत संपण्यास १२ दिवस शिल्लक

गोवा खंडपिठाने सरकारला निर्देश देतांना म्हटले होते की, ‘म्हादई अभयारण्य क्षेत्र आणि आजूबाजूचा परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करावा’ आणि त्यासाठी तीन मासांची मुदत दिली होती.

गोव्यात खासगी क्रीडा विद्यापिठाचे स्वागत करू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

काही संस्थांनी यात रस दाखवला आहे. जर एखाद्या खासगी संस्थेने ५० सहस्र चौ.मी. भूमी दाखवल्यास त्या संस्थेला विद्यापीठ चालू करता येईल. क्रीडा क्षेत्र हे भवितव्य घडवण्याचे एक साधन म्हणून अनेक जण त्याचा स्वीकार करणार आहेत.

कोयना धरण परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा !

कोयना धरण म्‍हणजेच शिवसागर जलाशयाच्‍या परिसरात पर्यटन विकासाला चालना मिळण्‍यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘शासकीय गुपिते कायदा १९२३’मध्‍ये अंशतः पालट करण्‍यात आला आहे.

मागण्‍या किंवा तक्रार यांच्‍यावर पुढील कार्यवाहीच नाही !

नागरिकांच्‍या समस्‍या सोडवू न शकणारे प्रशासन काय कामाचे ?

सिंधुदुर्ग : सावंतवाडीच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांना लाच स्वीकारतांना पकडले 

फसवणूक करणार्‍याला लाच घेऊन साहाय्य करणारे पोलीस जनतेचे शत्रूच !