चीनमधील इस्रायलच्या राजनैतिक अधिकार्‍यावर जीवघेणे आक्रमण !

बीजिंग (चीन) – इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध चालू असतांना इजिप्तनंतर आता चीनमध्येही इस्रायलींवर आक्रमण झाल्याची घटना समोर आली आहे. चीनमधील इस्रायलच्या एका राजनैतिक अधिकार्‍यावर चाकूद्वारे जीवघेणे आक्रमण करण्यात आले. इस्रायली विदेश मंत्रालयाने या घटनेची पुष्टी केली आहे. अधिकार्‍यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. याआधी इजिप्तमध्ये इस्रायली पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यात २ इस्रायलींसह इजिप्तचा एका नागरिक ठार झाला होता.

सौजन्य पंजाब केसरी टीव्ही 

संपादकीय भूमिका 

याआधी इजिप्तमध्येही इस्रायली पर्यटकांवर झालेल्या आक्रमणात २ इस्रायली ठार झाले होते !