हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक शस्त्रपूजन !

दसर्‍याच्या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून शस्त्रपूजन करणे, ही हिंदु धर्माची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवत हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक शस्त्रपूजन पार पडले.

पाश्‍चात्त्य संस्कृती आणि तत्त्वज्ञान अन् हिंदु संस्कृती आणि तत्त्वज्ञान

‘पाश्‍चात्त्य संस्कृती आणि तत्त्वज्ञान फक्त भौतिक आणि सामाजिक विषयांचा अभ्यास करतात. याउलट हिंदु संस्कृती आणि तत्त्वज्ञान भौतिक अन्‌ सामाजिक विषयांबरोबर आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करतात आणि ईश्‍वरप्राप्ती या ध्येयाच्या संदर्भात मार्गदर्शन करतात.’

छत्रपती संभाजीनगर येथे अतिक्रमण पथकावर दगडफेक करून साहाय्‍यक आयुक्‍तांना मारहाण !

‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशी वृत्ती नष्‍ट होण्‍यासाठी गुन्‍हेगारांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !

उदयनिधी स्‍टॅलीन, प्रियांक खर्गे आणि जितेंद्र आव्‍हाड यांना ‘हेट स्‍पीच’ प्रकरणी अटक करा !

हे आंदोलन निपाणी येथे कित्तूर राणी चनम्‍मा चौक येथे २५ ऑक्‍टोबरला करण्‍यात आले. या प्रसंगी विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्‍थित होते. तहसीलदार एम्.एन्. बाळीगार यांनी आंदोलनस्‍थळी येऊन निवेदन स्‍वीकारले.

कोरोना महामारीच्‍या काळात औषधी वनस्‍पतींचे महत्त्व जागतिक स्‍तरावर समजले ! – शेखर खोले, अध्‍यक्ष, आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन

आयुर्वेद ही आपली प्राचीन परंपरा असून कोरोना महामारीच्‍या काळात अश्‍वगंधा आणि गुळवेल या भारतीय औषधी वनस्‍पतींचे महत्त्व जागतिक स्‍तरावर लक्षात आले. भारतीय संस्‍कृती, अध्‍यात्‍म, आयुर्वेद हेच प्रत्‍येक समस्‍येवर शाश्‍वत उत्तर आहे.

खोडेगाव (जिल्‍हा छत्रपती संभाजीनगर) येथे मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या नेत्‍यांची अंत्‍ययात्रा !

या यात्रेत गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या वेळी काही ग्रामस्‍थांनी या नेत्‍यांच्‍या विरोधात घोषणा दिल्‍या.

अमेरिकेतील अराजक !

आज अमेरिकेत अस्‍तित्‍वात असलेली बंदूक संस्‍कृती, नव्‍हे विकृती उद्या विश्‍वभरात फोफावली, तर किती मोठा अनर्थ घडेल, याचे भान अमेरिकेला आहे तरी का ?

कल्‍याण तहसील कार्यालयातील लाचखोर उपलेखापालाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्‍त करून त्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !

केरळच्‍या साम्‍यवादी सरकारचा हिंदुद्वेष !

‘चिरायंकीळू मंदिराच्‍या आवारात शस्‍त्रास्‍त्र प्रशिक्षण देण्‍यात येऊ नये’, या केरळ उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयाचा आधार घेत राज्‍यातील मंदिरांच्‍या प्रांगणात रा.स्‍व. संघाच्‍या कार्यक्रमांवर बंदी घालण्‍याचा आदेश केरळ सरकारच्‍या देवस्‍वम् मंडळाने दिला आहे.