कल्‍याण तहसील कार्यालयातील लाचखोर उपलेखापालाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

ठाणे, २७ ऑक्‍टोबर (वार्ता.) – तक्रारदाराच्‍या परिचयातील व्‍यक्‍तीच्‍या शेतभूमीतील कुळकायदा कलम ४३ ची शर्थ शिथील करून भूमी भोगवटा वर्ग १ मध्‍ये रूपांतरित करून देण्‍यासाठी कल्‍याण येथील तहसीलदार कार्यालयातील उपलेखापाल गंगाधर अहिरे यांनी ६५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्‍या अन्‍वेषणात अहिरे यांनी लाचेची मागणी केल्‍याचे निष्‍पन्‍न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

 संपादकीय भूमिका 

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्‍त करून त्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !