हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक शस्त्रपूजन !

पुणे, २७ ऑक्टोबर (वार्ता) – दसर्‍याच्या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून शस्त्रपूजन करणे, ही हिंदु धर्माची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवत हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक शस्त्रपूजन पार पडले. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना, प्रतिज्ञा घेण्यात आली. या उपक्रमात बहुसंख्येने हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

शस्त्रपूजन करतांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच संचलित समर्थ रामदासस्वामी क्रीडा प्रबोधिनी’चे विद्यार्थी
शस्त्रपूजन करतांना आळंदेवाडी, भोर प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी
शस्त्रपूजनानंतर प्रतिज्ञा घेतांना कोथरूड येथील धर्मप्रेमी
शस्त्रपूजन करतांना देहू येथील धर्मप्रेमी महिला आणि मुली

पारगाव (सा.मा.) तालुका दौंड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. गणेश ताकवणे आणि श्री. सार्थक ताकवणे यांनी पुढाकार घेऊन सामूहिक शस्त्रपूजन केले. प्रशिक्षणवर्गातही दंडसाखळी ठेवून धर्मप्रेमींनी पूजन केले. अशाच प्रकारे आळंदेवाडी भोर, पेंजळवाडी भोर प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी, तसेच कोथरूड आणि देहू येथील प्रशिक्षणवर्गाच्या ठिकाणीही शस्त्रपूजन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच संचलित ‘समर्थ रामदासस्वामी क्रीडा प्रबोधिनी’च्या विद्यार्थ्यांनीही शस्त्रपूजन केले.

क्षणचित्र

‘सामूहिक पूजन मंदिरात पहिल्यांदाच होत आहे आणि पुष्कळ छान वाटले’, असे पेंजळवाडी, भोर प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी सांगितले.