#Exclusive : दीड वर्ष निवड आणि छाननी समितीच्या बैठका झाल्याच नाहीत !

‘कवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार देण्याविषयीच्या सरकारी यंत्रणांच्या उदासीनतेचे आणखी काही प्रकार उघड झाले आहेत. या पुरस्काराच्या निवडीसाठी सरकारने नेमलेल्या छाननी आणि निवड समित्यांच्या बैठका मागील दीड वर्षात झालेल्याच नाहीत, अशी माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे.

दोडामार्ग तालुक्यात शेतकर्‍यांना ‘भ्रमणभाष नेटवर्क’ नसते, तेव्हा ‘ऑनलाईन’ पीकनोंदणी करणे ठरते अडचणीचे !

कोकणासारख्या दुर्गम भागात नेटवर्कची अडचण येणार हे प्रशासनाला का समजत नाही ?

‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करा !’,  या ‘पोस्ट’ने कणकवलीत तणाव

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा आनंद व्यक्त करत ‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करा’, अशा प्रकारे शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानचा उदोउदो करणारी आणि हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या देवतांविषयी आक्षेपार्ह माहिती सामाजिक माध्यमातून प्रसारीत केली होती.

सरकारमधील मंत्र्यांसाठीच्या कर्मचार्‍यांच्या जून मासाच्या वेतनावर ७८ लाख रुपये खर्च

गोवा सरकारमध्ये मुख्यमंत्र्यासह एकूण १२ मंत्री आहेत. या सर्व मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये कार्यालय साहाय्यकापासून ‘विशेष सेवेसाठी अधिकारी’ (ओ.एस्.डी.) अशा विविध पदांसाठी एकूण १९२ कर्मचारी सेवेत आहेत.

‘आप’चे गोवा विभागाचे प्रमुख अमित पालेकर पोलिसांच्या कह्यात

बाणस्तारी येथे मर्सिडीस वाहनाने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी ‘आप’चे गोवा विभाग प्रमुख तथा अधिवक्ता अमित पालेकर यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

फातर्पा येथे शिक्षकाकडून, तर गोवा विद्यापिठातील प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग

गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !

माजी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना अटक !

पोलिसांनी खरे यांची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.

‘भारतरत्न’ नव्हे, ‘जुगाररत्न’चे फलक दाखवून आमदार बच्चू कडू यांचे सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन !

पैसा महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा आहे, हे सचिन तेंडुलकर यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी विज्ञापन सोडावे किंवा भारतरत्न तरी परत करावा, असे आवाहन या वेळी बच्चू कडू यांनी केले.

अदानी यांच्या माध्यमातून १ बिलीयन डॉलर विदेशात पाठवण्यात आले ! – राहुल गांधी, काँग्रेस

अदानी देशातील विविध मालमत्तांची खरेदी करत आहेत, असा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाच्या अन्वेषणाची मागणी केली.

कुटुंबियांचा भ्रष्टाचार उघड करणे, हे राष्ट्रकर्तव्यच !

‘तरुणांनो, आपले आई-वडील भ्रष्टाचार करून पाप करत असले, तर त्यांना पुढील पापांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचा भ्रष्टाचार उघड करा आणि तुमची राष्ट्रभक्ती वाढवा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले