पनवेल आणि भिवंडी येथून भांगमिश्रित पदार्थांचा साठा जप्त !

विविध ‘ब्रँड’च्या छोट्या मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमधून भांगमिश्रित पदार्थांची साठवणूक आणि विक्री करणार्‍यांवर उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाने पनवेल आणि भिवंडी येथे धाड घालून कारवाई केली आहे.

मंत्रालयात बाँब ठेवल्याचा दूरध्वनी, चाकू बाळगणार्‍या एकाला अटक !

निनावी दूरभाष करणारी व्यक्ती नगर जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे. यानंतर मंत्रालयाची इमारत आणि आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. या वेळी कुठेही बाँब सापडला नाही.

मानवी मनोरे रचतांना दुर्घटनाग्रस्त होणार्‍या ७५ सहस्र गोविंदांना विमा संरक्षण ! – संजय बनसोडे, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री

मंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, दहीहंडी उत्सव, प्रो-गोविंदा लीगमधील सहभागी मानवी मनोरे रचतांना अपघात होऊन गोविंदांचा मृत्यू होण्याची किंवा त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण होते.

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत रक्षाबंधन साजरे !

डोंबिवली येथे सनातन संस्थेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. राजेश मोरे यांना श्रीमती अमृता संभूस यांनी राखी बांधली.

सैन्यदलात कार्यरत असणार्‍यांनी कामासाठी माझ्याशी संपर्क साधावा ! – करवीर तहसीलदार

सर्वांनी असा आदर्श ठेवल्यास ‘सरकारी काम ६ मास थांब’, हे चित्र नक्कीच पालटेल !

आदिवासी खेळांचा क्रीडा विभागाच्या स्पर्धेत समावेश करण्यात येणार ! – संजय बनसोडे, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री

खेळाडूंना केंद्रस्थानी मानून क्रीडा विभागाचे निर्णय घेण्यात येत आहेत. सर्वसामान्य, होतकरू आणि गरीब कुटुंबातील खेळाडूंना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी सराव आणि स्पर्धेसाठी त्यांना आवश्यक ते साहाय्य करण्यात येणार आहे.

जीवनातील प्रत्येक क्षणी संत साहित्याचा सहवास आवश्यक !  – ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे

संतांच्या हातून लिहिले गेलेले साहित्य परिसासारखे प्रभावी असते. त्यात मानवी जीवनाचे सोने करण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळेच आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणी संत साहित्याचा सहवास आवश्यक आहे, असे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांनी सांगितले.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे मूळ नाव कायम ठेवून याचिका निकाली !

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांच्या आणि महसूल विभागाच्या नामांतराची अंतिम अधिसूचना राज्य सरकारने काढली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान याचिका निकाली काढली.