दोडामार्ग – शासनाच्या योजनेनुसार थेट शेतावर जाऊन ‘ॲप’द्वारे पीकनोंदणी करायची आहे; मात्र तालुक्यात अशा प्रकारे नोंदणी करतांना अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे शेतकर्यांची हानी होत आहे. त्यामुळे ऑनलाईनऐवजी ऑफलाईनद्वारे पीकनोंदणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाध्यक्ष संदीप गवस यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्यक्ष शेतावर जाऊन ॲपद्वारे नोंदीसाठी प्रयत्न केला असता ती होत नाही, तसेच याकरता बराच वेळ खर्च करावा लागतो. बर्याच ठिकाणी नेटवर्कची सुविधा मिळत नाही. तालुक्याची भौगोलिक परिस्थिती आणि नेटवकची समस्या लक्षात घेता शेतकर्यांना याचा नाहक त्रास होत आहे आणि पुढेही होणार आहे. यावर उपाययोजना काढावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप चांडेलकर, दोडामार्ग शहर अध्यक्ष सुदेश तुळसकर, नागेश तुळसकर, सागर नाईक आदी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाकोकणासारख्या दुर्गम भागात नेटवर्कची अडचण येणार हे प्रशासनाला का समजत नाही ? |