पुणे महापालिकेस ४५० कोटी रुपयांची देयके
पुणे – शहरासाठी १६.३६ टी.एम्.सी. पाणी कोटा संमत आहे. त्यातून शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; मात्र पाटबंधारे विभागाकडून घरगुतीऐवजी २० पट अधिक दर आकारून महापालिकेला देयके सादर केली जातात. त्यामुळे ४५० कोटी रुपयांचे देयक प्राप्त झाले आहे. या देयकांमध्ये पालट करण्याची विनंती पाटबंधारे विभागाला केली आहे. वर्ष २०२२-२३ साठी संमत केलेल्या पाण्याच्या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट ११ आणि २३ गावांचा पाणी कोटा वगळला आहे. या गावांसाठी पाणीपुरवठा योजनेतून पाणी देण्यात येत असल्याने तो कोटा वगळणे नियमबाह्य आहे. ‘मान्य पाणी वापरापेक्षा अधिक पाणी वापरल्यामुळे दंडाची रक्कम महापालिकेस द्यावी लागत आहे’, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे. पालट करण्याची विनंती पत्रव्यवहार करून केली जात आहे; परंतु विभागाकडून देयक प्राप्त झालेे नसल्याचे महापालिकेने सांगितले.