बिहारमधील शाळांमध्ये रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यांच्या सुट्ट्या रहित !

बिहार सरकारने अन्य धर्मियांच्या सुट्ट्या का रहित केल्या नाहीत ? यातून बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार मुसलमान अन् ख्रिस्ती यांना दुखावण्याचे टाळून हिंदूंवर अन्याय करत आहे, हे लक्षात येते !

दुसर्‍याचे क्षेत्र आपले सांगण्याची चीनची जुनी सवय !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी नव्या मानचित्रावरून चीनला सुनावले !

सरकारी अधिकार्‍यांवर अनावश्यक टीका करू नका ! – सर्वोच्च न्यायालय

सरकारी अधिकार्‍यांवर अनावश्यक किंवा चुकीची टीका करू नका. आवश्यक असेल, तेव्हाच टीका करावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींना दिला आहे.

रशियाच्या विमानतळावर १२ ड्रोनद्वारे आक्रमण : सैन्याची ४ विमाने नष्ट

रशियाच्या पेस्कोव्ह शहरातील विमानतळावर ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात रशियाची वाहतूक करणारी ४ सैनिकी विमाने नष्ट झाली. या आक्रमणात कोणतीही जीवित हानी झाली नाही. रशियाकडून आक्रमण करणार्‍या ड्रोन्सना पाडण्याचा प्रयत्न केला जात होता.

भारतापासून रक्षण होण्यासाठी  चीन अक्साई चीनमध्ये बनवत आहे बोगदे !

अक्साई चीन भारताचा भाग असून चीनने त्याच्यावर नियंत्रण मिळवले आहे. अक्साई चीन पुन्हा भारतात समाविष्ट करण्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत !

वर्ष २००८ मधील बेंगळुरूतील साखळी बाँबस्फोटाच्या प्रकरणी महंमद अरशद खान याला अटक

वर्ष २००८ मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या साखळी बाँबस्फोटाच्या प्रकरणी आणखी एका आरोपीला नुकतीच अटक करण्यात आली. आतंकवादी गटाचा पसार म्होरक्या महंमद जुनैद याचा साथीदार महंमद अरशद खान याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे.

कर्णावती (गुजरात) येथे हिंदु तरुणासमवेत जाणार्‍या मुसलमान तरुणीला मुसलमानांकडून मारहाण !

याविषयी पुरो(अधो)गामी, निधर्मी आणि व्यक्तीस्वातंत्र्यवाले तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

कॅलिफोर्निया (अमेरिका) राज्याने संमत केलेल्या जातीभेदविरोधी विधेयकाला हिंदूंचा विरोध !

या विधेयकानुसार राज्यातील समान नागरी हक्क कायदा, शिक्षण आणि गृहनिर्माण संहिता यांच्यात सुधारणा करून वंशावळी अंतर्गत जातीचा समावेश संरक्षित श्रेणी म्हणून करण्यात आला आहे.

कराची (पाकिस्तान) येथे आंदोलन करणार्‍या बलुच कार्यकर्त्यांना अटक

पाकिस्तानातील कराचीमध्ये गेल्या ४ दिवसांपासून बलुच कार्यकर्त्यांचे आंदोलन चालू आहे. सिंध पोलिसांनी महिलांसह अनेक बलुच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अपहरण करण्यात आलेले दाद शाह बलोच यांची सुटका करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.

देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ! – शिकागो विश्‍वविद्यालयाचा अहवाल

प्रदूषणामुळे देहलीतील नागरिकांच्या आयुर्मानात होत आहे ११ वर्षे ९ मास इतकी घट !