तेलगी घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मी अटकेपासून वाचवले ! – शरद पवार

घोटाळ्यांत सहकार्‍यांना वाचवणारे नेते पक्षात फूट पडल्यावर मात्र एकमेकांवर आरोप करत आहेत. यातून या नेत्यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याचेच उघड होते.  त्यामुळे या प्रकरणांची नव्याने चौकशी करून भ्रष्टाचार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे

श्री महाकालीमातेला फाशी देण्यात येत असलेले मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाची ‘अ‍ॅमेझॉन’कडून विक्री !

अ‍ॅमेझॉनकडून सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे साहित्य विक्री केले जात असल्याने आता भारत सरकारने या आस्थापनावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

गणेशोत्सवात आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेची चेतावणी !

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी आतंकवाद नष्ट करण्यासाठी प्रभावी पावले न उचलल्याने हिंदूंचे सण आणि उत्सव आतंकवादाच्या सावटाखाली साजरे करण्याची लाजिरवाणी स्थिती ओढवली आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

चंद्रावर सापडला प्राणवायू !

भारताच्या ‘चंद्रयान-३’ ला मोठे यश मिळाले आहे. चंद्रावर उतरलेल्या ‘विक्रम’ लँडरमधून बाहेर पडलेल्या ‘प्रज्ञान’ रोव्हर या रोबोटने चंद्रावर प्राणवायू (ऑक्सिजन) असल्याचे शोधले आहे. यासह या रोव्हरला त्याला चंद्रावर ८ खनिजेही सापडली आहे.

सनातन संस्थेच्या वतीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बांधली राखी !

सनातनच्या साधिका सौ. गिरीजा गावकर यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. या वेळी सौ. गीता तुळशीदास गांजेकर आणि सौ. लता मारुति किल्लेकर याही उपस्थित होत्या.

देहलीत ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनाच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या !

भारताच्या राजधानीत इतक्या सहजपणे कुणीही कुणाची हत्या करू शकतो, हे पोलिसांना लज्जास्पद !

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घाला ! – सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघ

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे पर्यावरणास हानी पोचत आहे. त्यामुळे अशा मूर्ती बनवणे, त्यांची आयात करणे आणि साठवणूक करणे यांवर बंदी घालावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्‍यांवर कारवाई करणार ! – प्रवीण आर्लेकर, अध्यक्ष, हस्तकला महामंडळ

प्रतिवर्षी अशी चेतावणी दिली जाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळही काही मूर्तीशाळांवर धाड घालून श्री गणेशमूर्ती मातीचीच आहे ना, याची पडताळणी करते; पण मूर्ती विसर्जनानंतर अनेक ठिकाणी पाण्यात मूर्ती तरंगतांना दिसतात.

गोव्यातील आमदार आता लेह-लडाखच्या अभ्यास दौर्‍यावर जाणार

आमदार अभ्यास दौर्‍यात काय शिकले ? त्याचा राज्यासाठी काय लाभ झाला ? किंवा होणार, ते जनतेला सांगावे, अन्यथा ‘असे अभ्यास दौरे हा केवळ जनतेच्या पैशातून मौजमजा करण्याचा एक प्रकार आहे’, असे जनतेला वाटल्यास त्यात चुकीचे काय !