कॅलिफोर्निया (अमेरिका) राज्याने संमत केलेल्या जातीभेदविरोधी विधेयकाला हिंदूंचा विरोध !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या विधीमंडळाने जातीभेदविरोधी विधेयकाला संमती दिल्यानंतर त्याला ‘अ कोअ‍ॅलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका (कोहना)’ या हिंदु संघटनेने विरोध केला आहे. ‘हा कॅलिफोर्नियाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. या विधेयकानुसार राज्यातील समान नागरी हक्क कायदा, शिक्षण आणि गृहनिर्माण संहिता यांच्यात सुधारणा करून वंशावळी अंतर्गत जातीचा समावेश संरक्षित श्रेणी म्हणून करण्यात आला आहे. हे विधेयक अमेरिकेतील हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी आहे’, असा आरोप या संघटनेने केला आहे.

या विधेयकाला संमती दिल्याने भेदभावविरोधी कायद्यांत जातीचा समावेश संरक्षित श्रेणीत करणारे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे. या विधेयकाला अमेरिकेतील जातीसमानता मानवाधिकार कार्यकर्ते आणि संघटना यांनी पाठिंबा दिला आहे.