भूमिका स्पष्ट न केल्यास सचिन तेंडुलकर यांना कायदेशीर नोटीस पाठवणार ! – आमदार बच्चू कडू

केवळ पैशांसाठी विज्ञापन करून तरुणाईला ‘ऑनलाईन गेमिंग’ला बळी पाडले जात असेल, तर त्याला आम्ही विरोध करू.

भिवंडी येथे शाळकरी मुलीचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला नागरिकांकडून चोप !

इरफान हसीफ शेख पोलिसांच्या कह्यात आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

(म्हणे) ‘सनातन धर्माने जातीच्या नावावर देशाचे विभाजन केले !’-विधानसभा अध्यक्ष अप्पावू

ब्रिटिशांनी वर्ष १७९५ मध्ये शूद्रांसह प्रत्येकाला मालकी हक्क बहाल केला, तर मग वर्ष १९४७ पर्यंत, म्हणजे १५० वर्षांमध्ये शूद्रांकडे भूमी का नव्हत्या ?

मणीपूरमध्ये ३० टक्के असणार्‍या ख्रिस्ती धर्मीय कुकी समाजाकडून होत आहे स्वतंत्र राज्याची मागणी !

मणीपूरमध्ये गेल्या ४ मासांपासून हिंसाचार चालू आहे. संसदेतही यावरून गदारोळ झाला. आता मणीपूरचे विभाजन करून वेगळे ‘कुकीलँड’ राज्य स्थापन करण्याची मागणी ख्रिस्ती धर्मीय असणार्‍या कुकी समाजाकडून केली जात आहे.

चीनची हेरगिरी करणारी दुसरी नौका श्रीलंकेत येणार !

श्रीलंकेला दिवाळखोरीत सर्व प्रकारचे साहाय्य करणार्‍या भारताचा विरोध डावलून श्रीलंका चीनला अशा प्रकारे साहाय्य करतच रहाणार असेल, तर भारताने त्याला साहाय्य करण्याविषयी विचार करण्याची आवश्यकता आहे !

याला म्हणतात साधी रहाणी उच्च विचारसरणी, हेच खरे भारतीयत्व ! – अभिनेत्री कंगना रणौत

अभिनेत्री कंगना राणावत यांनी ‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. कंगना यांनी महिला शास्त्रज्ञांचे छायाचित्र ट्वीट करत म्हटले, ‘भारतातील आघाडीच्या शास्त्रज्ञांकडे पहा. प्रत्येकीने साडी नेसली आहे, कपाळावर बिंदी, कुंकू लावून मंगळसूत्रही घातले जाते.

भालाफेकीत नीरज चोप्रा याला मिळाले सुवर्णपदक !

बुडापेस्ट येथे चालू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकले. पाकिस्तानच्या खेळाडूला मागे टाकत नीरज याने हा विजय संपादन केला.

शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुसलमान विद्यार्थ्यांला अन्य विद्यार्थ्यांद्वारे मारहाण करण्यात आलेली शाळा बंद !

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी कारवाई होईल, अशी हिंदूंना अपेक्षा नव्हती !

चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करा ! – स्वामी चक्रपाणी महाराज, अध्यक्ष, हिंदु महासभा

भारताचे चंद्रयान-३ चंद्रावर उतरल्यानंतर आता हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी ‘चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करा’, अशी मागणी केली आहे.

पूर्वीच्या सरकारांचा ‘इस्रो’वर विश्‍वास नव्हता ! – माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन्

पूर्वीच्या सरकारांचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेवर (इस्रोवर) विश्‍वास नव्हता, असा दावा ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी केला आहे. नंबी नारायणन् यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.