(म्हणे) ‘सनातन धर्माने जातीच्या नावावर देशाचे विभाजन केले !’-विधानसभा अध्यक्ष अप्पावू

तमिळनाडू विधानसभा अध्यक्ष अप्पावू यांचा जावईशोध !

अप्पावू

चेन्नई – सनातन धर्माने जातीच्या नावावर देशाचे विभाजन केले, असे वादग्रस्त विधान तमिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष अप्पावू यांनी नुकतेच केले. विधानसभा अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले की, ब्रिटिशांनी वर्ष १७९५ मध्ये प्रत्येकाला भूमीचा मालकी हक्क दिला होता. त्या काळी शूद्रांना भूमी बाळगण्याचा अधिकार नव्हता. तसेच ते म्हणाले की, लॉर्ड मॅकोले यांनी वर्ष १८३५ मध्ये सर्वांना शिक्षण उपलब्ध करून दिले.

(ब्रिटिशांनी वर्ष १७९५ मध्ये शूद्रांसह प्रत्येकाला मालकी हक्क बहाल केला, तर मग वर्ष १९४७ पर्यंत, म्हणजे १५० वर्षांमध्ये शूद्रांकडे भूमी का नव्हत्या ? लॉर्ड मॅकोले याने वर्ष १८३५ मध्ये सर्वांना शिक्षण उपलब्ध करून दिल्याचा दावा धादांत खोटा आहे; कारण मॅकोले यांना भारतियांना ब्रिटिशांचे गुलाम बनवायचे होते आणि त्यासाठी त्यांनी भारतातील प्रचलित गुरुकुल शिक्षणपद्धत बंद पाडून भारतियांना कारकून बनणारी शिक्षणपद्धत देशात लागू करायची होती. त्यामुळे झालेली हानी भारत आजही भोगत आह ! – संपादक)

अप्पावू पुढे म्हणाले, ‘जातीचा वापर करून आमच्यात भेदभाव केला गेला. आम्हाला दूर ठेवले गेले आणि आम्हाला कोणतेही अधिकार दिले गेले नाहीत. आम्हाला गुलामाप्रमाणे वागणूक देण्यात आली. पेरियार, करुणानिधी आणि आता मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सरकारने राज्याचा विकास केल्याचा दावा विधानसभा अध्यक्षांनी केला.