जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत ४० वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्णपदक !
बुडापेस्ट (हंगेरी) – येथे चालू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकले. पाकिस्तानच्या खेळाडूला मागे टाकत नीरज याने हा विजय संपादन केला. गेल्या ४० वर्षांत जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. गेल्या वर्षी नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. याआधी ऑलिंपिक स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक पटकावले आहे.
Neeraj Chopra brings home GOLD🥇 #NeerajChopra wins historic World Athletics Championships gold with incredible 88.17 throw in the javelin final. The other two Indian javelin throwers in contention – Kishore Jena and DP Manu – also produced impressive performances even as they… pic.twitter.com/713J5oV2zm
— Pinkvilla (@pinkvilla) August 28, 2023