हिंदु महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराजांची मागणी
नवी देहली – भारताचे चंद्रयान-३ चंद्रावर उतरल्यानंतर आता हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी ‘चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करा’, अशी मागणी केली आहे.
‘Declare moon a Hindu Rashtra with Shiv Shakti Point as capital before Jihadis claim it’: demands Swami Chakrapani Maharajhttps://t.co/zaVA2af3at
— OpIndia.com (@OpIndia_com) August 27, 2023
१. स्वामी चक्रपाणी महाराज यांनी ट्वीट करून म्हटले आहेे, ‘चंद्रयान-३ ज्या ठिकाणी उतरले त्या जागेला ‘शिवशक्ति पॉईंट’ असे नाव देण्यात आले आहे. कुठल्याही जिहादी विचारसरणीचा माणूस तेथे जाऊन ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामी राज्यासाठी युद्ध करणे) करील, जिहाद करून तेथे कट्टरतावादी विचार पसरवेल, आतंकवाद पसरवेल त्यापूर्वी संसदेत प्रस्ताव संमत करून चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करण्यात यावे आणि ‘शिवशक्ति पाईंट’ला चंद्राची राजधानी बनवावी.’
२. स्वामी चक्रमाणी महाराज यांनी पुढे म्हटले की, राजधानी ‘शिवशक्ति पाईंट’च व्हायला हवी; कारण चंद्र भगवान शिवाच्या मस्तकावर आहे. हिंदूंचे चंद्राशी जुने संबंध आहेत. आपल्या शास्त्रांमध्ये चंद्राचा अनेक प्रकारे उल्लेख आहे. चंद्राचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठीच त्याला हिंदु सनातन राष्ट्र घोषित करण्यात यावे.