‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञांनी कपाळावर कुंकू लावणे, गळ्यात मंगळसूत्र घालण्याचे अभिनेत्री कंगना रणौत यांच्याकडून कौतुक !
मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत यांनी ‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. कंगना यांनी महिला शास्त्रज्ञांचे छायाचित्र ट्वीट करत म्हटले, ‘भारतातील आघाडीच्या शास्त्रज्ञांकडे पहा. प्रत्येकीने साडी नेसली आहे, कपाळावर बिंदी, कुंकू लावून मंगळसूत्रही घातले जाते. ही साधी रहाणी उच्च विचारसरणीचे हे प्रतीक आहे. हे खरे भारतीयत्व आहे. आजची आधुनिक पिढी साडी नेसणे, कुंकू लावणे, मंगळसूत्र घालणे याला मागासलेली मानसिकता म्हणते. पाश्चिमात्य कपडे घालणार्यांची विचारसरणी आधुनिक आहे, असे त्यांना वाटते. कपड्यांचा आणि विचारांचा काहीही संबंध नसतो, हे या महिला शास्त्रज्ञांनी सिद्ध केले. या महिलांनी असे काम केले आहे, ज्यासाठी असामान्य प्रतिभा आवश्यक आहे.’
Kangana Ranaut lauds Chandrayaan-3 scientists wearing ‘bindi, sindoor, mangalsutra’: Simple living, high thinking https://t.co/JQbI593Re1
— HT Entertainment (@htshowbiz) August 27, 2023
संपादकीय भूमिकाभारतीय महिला शास्त्रज्ञांकडून हा आदर्श देशातील तरुणी घेतील, याची शक्यता अल्पच आहे; कारण त्यांना याचे महत्त्वच ठाऊक नाही ! यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! |