शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुसलमान विद्यार्थ्यांला अन्य विद्यार्थ्यांद्वारे मारहाण करण्यात आलेली शाळा बंद !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील नेहा पब्लिक स्कुलमध्ये विकलांग शिक्षिकेने घरचा अभ्यास न केल्यावरून एका मुसलमान विद्यार्थ्याला अन्य विद्यार्थ्यांद्वारे मारण्यास सांगून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर देशभरात टीका होऊ लागल्यानंतर आता प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी ही शाळा बंद केली आहे. शिक्षिका तृप्ता त्यागी यांच्या मालकीची ही खासगी शाळा आहे. याविषयी शिक्षणाधिकार्‍यांनी सांगितले की, या शाळेने शिक्षण खात्याच्या निकषांची पूर्तता केली नसल्याने मान्यता रहित करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. शाळेतील सर्व ५० विद्यार्थ्यांना एका आठवड्यात सरकारी शाळेत किंवा इतर शाळांमध्ये सामावून घेतले जाईल.

संपादकीय भूमिका 

  • उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी कारवाई होईल, अशी हिंदूंना अपेक्षा नव्हती !
  • जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्यामुळे मुसलमान शिक्षकाने हिंदु विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याने विद्यार्थ्याला रुग्णालयात भरती करावे लागले. काश्मीरमधील प्रशासनाने मात्र या शाळेवर बंदी घातली नाही. हा विरोधाभास का ?