सिंधुदुर्ग : देहलीतील अल्पवयीन मुलगी वेंगुर्ल्यात सापडल्याच्या प्रकरणात आणखी एका मुसलमानाचा सहभाग

देहली येथून गायब झालेल्या आणि वेंगुर्ला येथे मुसलमानाकडे सापडलेल्या पीडित मुलीने देहली न्यायालयात दिलेल्या जबाबात या गुन्ह्यात अश्रफ मुजावर, वेंगुर्ला याचेही नाव घेतले. त्यामुळे या प्रकरणात आता २ मुसलमान सहभागी असल्याचे स्पष्ट !

देवगड (सिंधुदुर्ग) : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील कुणकेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

मंदिरात वस्त्रसंहिता लागू केल्याविषयी श्री देव कुणकेश्वर देवस्थान समितीचे अभिनंदन ! हिंदु संस्कृतीचे रक्षण व्हावे आणि मंदिराचे पावित्र्य जपले जावे, यासाठी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करत असल्याचे देवस्थान समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करून म्हादई वाचवा ! – प्रा. राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

म्हादई जलविवाद लवादाने कर्नाटकला पाणी वळवण्यासाठी पर्यावरण आणि वन्यजीव अनुज्ञप्ती घेणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. म्हादई व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित झाल्यास कर्नाटकला या अनुज्ञप्ती मिळणे कठीण होणार आहे.

गोवा : अब्दुल करोल आणि सहकारी यांच्या शुक्रवारी होणार्‍या धार्मिक कार्यक्रमावर बंदी घाला !

या ठिकाणी प्रत्येक शुक्रवारी आणि इतर दिवशी ध्वनीक्षेपकाद्वारे सहकार्‍यांना संबोधित करतात. हा प्रकार रात्री उशिरापर्यंत चालू असतो. यामुळे गावातील शांतता भंग होत आहे.

गोवा : वर्ष १९७० मध्येच ‘वास्को’ शहराचे नामांतर ‘संभाजी’ झाले होते !

२० नोव्हेंबर १९७० या दिवशीच्या राजपत्रात आहे नोंद ! स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे हे अपुरे राष्ट्रीय कार्य पूर्ण करून त्यांच्या ५० व्या पुण्यतिथीच्या वर्षात त्यांना अनुरूप श्रद्धांजली द्यावी, अशी समस्त गोमंतकियांची अपेक्षा भाजप सरकारने पूर्ण करावी.

पुणे येथील ५ व्‍या मानाच्‍या ‘केसरी वाडा’ गणपति बाप्‍पाचे आगमन !

मानाच्‍या ५ व्‍या ‘केसरी वाडा’ येथील गणपतिबाप्‍पाचे आगमन ‘टिळक पंचांगा’नुसार होते. २० ऑगस्‍ट या दिवशी गणपति बाप्‍पाचे ‘केसरी वाड्या’त ढोल-ताशांच्‍या गजरात आगमन झाले. ‘२० ऑगस्‍टपासून पुढील मासापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले असल्‍याची माहिती ‘केसरी वाडा’ गणेशोत्‍सवाचे अध्‍यक्ष दीपक टिळक यांनी दिली.

पहिल्‍या श्रावण सोमवारी श्री महालक्ष्मीदेवीची माहेश्‍वरी रूपात पूजा !

पहिल्‍या श्रावणी सोमवारी साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवीची माहेश्‍वरी रूपात पूजा बांधण्‍यात आली होती. ही अलंकार पूजा श्रीपूजक श्री. शेखर मुनीश्‍वर यांनी बांधली होती. या पूजेचे ‘त्रिशूल चंद्रा हिधरे महावृषभ वाहिनी माहेश्‍वरी सरूपेण नारायणी नमोस्‍तुते’, असे वर्णन करण्‍यात येते.

गणेशोत्‍सव, दहीहंडी उत्‍सव शांततेत आणि उत्‍साहात साजरा करा !

गणेशोत्‍सव, दहीहंडी, तसेच अन्‍य आगामी सण- उत्‍सव शांततेत आणि उत्‍साहात साजरे करावेत, त्‍यादृष्‍टीने सर्व संबंधित यंत्रणा अन् मंडळांनी समन्‍वयाने काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केले.

लेहजवळील दुर्घटनेत राजाळे (जिल्‍हा सातारा) येथील सैनिक वैभव भोईटे यांचा अपघाती मृत्‍यू !

काश्‍मिर खोर्‍यातील लेह-लडाख येथे १९ ऑगस्‍ट या दिवशी कर्तव्‍यावर असतांना झालेल्‍या अपघातात ९ सैनिक ठार झाले आहेत. यामध्‍ये सातारा जिल्‍ह्यातील फलटण तालुक्‍यातील राजाळे गावचे सुपुत्र वैभव संपतराव भोईटे हे हुतात्‍मा झाले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच राजाळे गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

हिंदु राष्‍ट्र निर्मितीच्‍या चळवळीचे ‘सनातन प्रभात’ हे मुखपत्र ! – योगेश तुरेराव, संपादक, दैनिक ‘अग्रणी वार्ता’

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी आवश्‍यक वातावरण निर्माण करण्‍याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले आहे. हिंदु राष्‍ट्र निर्मितीच्‍या चळवळीचे ‘सनातन प्रभात’ हे मुखपत्र आहे. धर्मशिक्षणाची आवश्‍यकता ओळखून ‘सनातन प्रभात’ने ते वृत्तपत्रातून देण्‍याचा प्रयत्न केला आहे.