सातारा, २१ ऑगस्ट (वार्ता.) – काश्मिर खोर्यातील लेह-लडाख येथे १९ ऑगस्ट या दिवशी कर्तव्यावर असतांना झालेल्या अपघातात ९ सैनिक ठार झाले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील राजाळे गावचे सुपुत्र वैभव संपतराव भोईटे हे हुतात्मा झाले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच राजाळे गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
१९ ऑगस्टला सायंकाळी लेहमधील न्योमा भागातील कियारी येथे लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळले. या वाहनात कर्तव्यावर निघालेले सैैैनिक होते. या दुर्घटनेत ९ सैनिकांसह एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा (जेसीओ) मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर घायाळ आहे. ही घटना कळताच लष्कराकडून तातडीने बचाव कार्य चालू करण्यात आले. घायाळ असलेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचार चालू असतांना त्यातील एका सैनिकाचा मृत्यू झाला.
Northern Army chief, GOC 14 Corps pay tributes to 9 jawans killed in Leh accidenthttps://t.co/r58YNl0HZO pic.twitter.com/DhOEyOkmpY
— Hindustan Times (@htTweets) August 21, 2023