औरंगजेबाचे महिमा मंडन करणार्‍यांना सोडणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

‘लव्ह जिहाद’, फसवून विवाह करणे याविषयी इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी योग्य कायदा अस्तित्वात आणू. मशिदींवरील भोंग्यांविषयीचे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या निर्देशांचे कुणी उल्लंघन करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

वृक्षलागवडीचा चौकशी अहवाल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करा !

राज्यातील ३३ कोटी वृक्षलागवडीचा अहवाल येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात यावा, यासाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांच्या वतीने ४ ऑगस्ट या दिवशी विधासनभेत या समितीच्या पुनर्गठनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

कोकणात कायमस्वरूपी ‘आपत्ती प्रतिसाद दल’ उभारण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा !

आमदार प्रवीण दरेकर यांच्या मागणीची नोंद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोकणात कायमस्वरूपी आपत्ती निवारण केंद्रे उभारण्यात येतील’, अशी घोषणा केली आहे.

नांदगाव (सिंधुदुर्ग) रेल्वेस्थानकावर ‘तुतारी एक्सप्रेस’ थांबणार

‘कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वेस्थानकावर ‘तुतारी एक्सप्रेस’ या गाडीला थांबा मिळावा’, अशी मागणी मंत्री राणे यांनी केली. या मागणीनुसार रेल्वेमंत्री वैष्णव यांनी ही गाडी नांदगाव येथे थांबवण्याची अनुमती दिली.

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग – महाराष्ट्र) येथे पाकिस्तानी नागरिकाच्या नावे ८५ गुंठे भूमी

सध्या या भूमीवर आंबा आणि काजू कलमांची लागवड आहे. शासनाने या झाडांचा लिलाव केला असून या भूमीच्या भोवती तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया चालू केली आहे. शासनाने ही भूमी कह्यात घेतल्यानंतर ७/१२ वर भारत शासनाचे नाव आले आहे.

राज्यात कौटुंबिक न्यायालय स्थापन करा ! – आमदार उल्हास तुयेकर, भाजप, गोवा

घटस्फोट होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत; मात्र जोडीदारांच्या अहंकारामुळे प्रश्न सुटत नाहीत. यामुळे कुटुंबातील सदस्यांना अनेक अडचणी येत आहेत. ही प्रकरणे अनेक वर्षे प्रलंबित रहातात.

म्हादई ‘प्रवाह’च्या ३ सदस्यांनी गोव्याच्या मुख्य सचिवांची घेतली भेट

म्हादई नदीचे पाणी अनधिकृतपणे वळवले जाऊ नये आणि पाण्याचे योग्यरित्या वितरण व्हावे, यासाठी केंद्रशासनाने म्हादई ‘प्रवाह’ प्राधिकरणाची स्थापना केली आहे. मुख्यालय गोव्यात पणजी येथे होणार आहे.

पाद्री पेरेरा यांच्या विरोधात गोव्यात ४ तक्रारी : कारवाईची मागणी

आजपर्यंत हिंदूंनी अशा तर्‍हेच्या विधानांना कोणताही प्रतिकार न करता सहन केले आहे. खोटा इतिहास आणि पोर्तुगिजांची चमचेगिरी सहन केली जात आहे. सहनशीलतेलाही अंत असतो, याचे भान या विकृतांनी ठेवावे, नाहीतर ही परधार्जिणी प्रवृत्ती ठेचण्याची वेळ यायला विलंब लागणार नाही, हे सत्य !

भारतातील सर्व मुसलमानांनी हिंदु धर्म स्वीकारावा !

के.आर्.के. यांनी म्हटले आहे की, मी भारताच्या सर्व मुसलमानांना सल्ला देतो की, त्यांनी धर्मांतर करून हिंदु व्हावे; कारण तुमचे कुटुंब आणि मुले यांचे जीवन कोणत्याही धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.

यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !

‘भक्तांकडेच मंदिरे हवीत, तरच देवाची सेवा भावपूर्ण होईल. सरकारीकरणामुळे मंदिरातील देवाची सेवा भावपूर्ण होत नाही, तसेच सरकारमध्ये असलेला भ्रष्टाचार देवळातही होतो. त्यामुळे देव मंदिरातून जाईल आणि भक्तांना देवळात जाण्याचा लाभ होणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले