गोव्यात एका मासात ४० घटस्फोट या पार्श्वभूमीवर . . .
पणजी, ३ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा राज्यात एका मासात ४० घटस्फोट, तर एका वर्षाला सुमारे ५०० घटस्फोट होत आहेत. घटस्फोट होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत; मात्र जोडीदारांच्या अहंकारामुळे प्रश्न सुटत नाहीत. यामुळे कुटुंबातील सदस्यांना अनेक अडचणी येत आहेत. ही प्रकरणे अनेक वर्षे प्रलंबित रहातात.
ही प्रकरणे सोडवण्यासाठी गोव्यात इतर राज्यांच्या धर्तीवर कौटुंबिक न्यायालय स्थापन करावे, अशी मागणी भाजपचे नावेली मतदारसंघाचे आमदार उल्हास तुयेकर यांनी विधानसभेत कायदा खात्यावरील अनुदानित मागण्यांवरील चर्चेत बोलतांना केली.