आधार नोंदणी केल्यास राज्यातील २०-२५ टक्के विद्यार्थी बोगस आढळतील ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

मागील काही काळापासून आपण राज्यातील शाळांची पटपडताळणी करत आहोत; मात्र ती पूर्ण होऊ शकलेली नाही. पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांची आधार नोंदणी होऊ शकलेली नाही.

शिक्षणावरील गुंतवणुकीच्या तुलनेत सामाजिक परतावा येत नाही ! – देवेंद्र फडणवीस

शिक्षणातून सामाजिक उपयोगता मिळण्यासाठी पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीऐवजी भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षणप्रणाली आणणे आवश्यक आहे !

गोवा : नूतनीकरण केलेल्या सप्तकोटीश्वर मंदिराच्या छताला गळती

पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई, स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासह मंदिराला भेट देऊन छतावरून होणार्‍या पाण्याच्या गळतीसह पाण्याचा निचरा होण्यात येणार्‍या अडचणी, परिसरात पाण्यामुळे झालेली निसरड आदींची पहाणी केली.

दिव्यांग शाळांमधील बनावट नोकरभरती आणि ना-हरकत प्रमाणपत्रे यांविषयी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करणार ! – शंभूराज देसाई, मंत्री

राज्यातील दिव्यांग शाळांमधील बनावट नोकरभरती आणि ना हरकत प्रमाणपत्र यांसाठी जे अधिकारी दोषी असतील त्यांची १ मासात चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षितेसाठी उपाययोजना करण्यात येणार असून सफाई कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २६ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

छत्रपती संभाीनगर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करण्यात येणार असून आवश्यक तो निधीही देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २६ जुलै या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना दिली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापिठातील विद्यार्थ्यांना जुने पेपर दिल्याच्या प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री  

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतर्गत चालू व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या परीक्षेत सलग सातव्या पेपरला विद्यार्थ्यांना जुनीच प्रश्नपत्रिका देण्यात आल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली जाईल.

गोवा : करंझोळला रेल्वेमार्गावर दरड कोसळली 

संततधार पडणारा पाऊस आणि त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने, तसेच जमीन फुगल्याने, दूधसागर ते कॅसलरॉक यामधील करंझोळ रेल्वेस्थानकाच्या ब्रागांझा घाटात दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली.

‘ऑनलाईन गेमिंग’ या जुगाराला गोव्यात थारा देणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

‘‘ऑनलाईन गेमिंग’च्या विरोधात आवश्यकता भासल्यास कायदा करण्यात येईल आणि यासाठी तमिळनाडू येथील कायद्याचा अभ्यास केला जाणार आहे. गोव्यात ‘ऑनलाईन गेमिंग’ हा प्रकार खपवून घेणार नाही.’’

मुंबईत गॅस्‍ट्रो आणि लेप्‍टो यांच्‍या रुग्‍णांत वाढ

जुलै मध्‍ये धुंवाधार आणि सतत पाऊस पडत असल्‍यामुळे मुंबईतील रुग्‍णसंख्‍येत वाढ झाली आहे. १ सहस्र २७४ गॅस्‍ट्रोचे, हिवतापाचे ४१५, तर लेप्‍टोचे २४९ रुग्‍ण आहेत.