पुरातत्व मंत्र्यांकडून घटनास्थळी भेट देऊन पहाणी
डिचोली – नूतनीकरण केलेल्या नार्वे (डिचोली) येथील सप्तकोटीश्वर मंदिराच्या छताला गळती लागली आहे. या मंदिराच्या नूतनीकरणावर ७ कोटी ७० लाख रुपये खर्च करण्यात आले होते.
पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज २६ जुलैला स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासह मंदिराला भेट देऊन छतावरून होणार्या पाण्याच्या गळतीसह पाण्याचा निचरा होण्यात येणार्या अडचणी, परिसरात पाण्यामुळे झालेली निसरड आदींची पहाणी केली. मंदिराच्या विद्युतीकरणावर ७० लाख खर्च करण्यात आले होते; पण या संदर्भात अनेक समस्या आहेत.