बनावट ओळखपत्रांच्‍या आधारे लोकांचा पुणे महापालिकेच्‍या इमारतीत प्रवेश !

हा आहे पुणे महापालिकेचा कारभार ! अशा पद्धतीने कामकाज चालत असल्‍यास महापालिकेची सुरक्षा काय रहाणार ?

‍विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र यांच्यातील भेद !

आधुनिक विज्ञान निरनिराळ्या ग्रहांचे केवळ पृथ्वीपासूनचे अंतर आणि त्याची भौगोलिक स्थिती एवढेच सांगते. याउलट ज्योतिषशास्त्र ग्रहांचे मानवावर होणारे परिणाम, अनिष्ट परिणाम टाळावयाचे उपाय इत्यादी सर्व सांगते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सतत कृतज्ञताभावात रहाणार्‍या सनातनच्‍या संत पू. (श्रीमती) आशा भास्‍कर दर्भेआजी यांचा कोल्‍हापूर येथे देहत्‍याग !

देहत्‍याग करण्‍यापूर्वी अनुमाने १५ दिवस त्‍यांचे खाणे-पिणे अत्‍यल्‍प झाले होते; मात्र त्‍याही स्‍थितीत त्‍या अगदी शांत होत्‍या. त्‍यांच्‍या देहत्‍यागानंतर त्‍या ज्‍या खोलीत होत्‍या, ती खोली आणि घर येथील चैतन्‍य अन् प्रकाश यांत वाढ झाली होती.

मिठी नदीतील गाळ काढण्‍यासाठी विशेष अन्‍वेषण पथकाची नियुक्‍ती करू ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

मागील १७ वर्षांपासून मिठी नदीच्‍या सौंदर्यीकरणासाठी १३०० कोटी रुपये व्‍यय करूनही नदी प्रदूषणापासून मुक्‍त झालेली नाही.

‘लव्‍ह जिहाद’ थांबवण्‍यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्‍यक !

हिंदु राष्‍ट्र सेनेचे अध्‍यक्ष धनंजय देसाई यांचे तुळजापूर येथील ‘हिंदु गर्जना सभे’त आवाहन !

राधानगरी धरणाची ४ द्वारे उघडल्‍याने कोल्‍हापुरात पंचगंगा नदी ४५ फूट पाणीपातळी गाठण्‍याची शक्‍यता ! – राहुल रेखावार, जिल्‍हाधिकारी, कोल्‍हापूर

धरणक्षेत्रात सातत्‍याने पाऊस चालू असल्‍याने राधानगरी धरण पूर्णपणे भरल्‍याने त्‍याची ४ स्‍वयंचलीत द्वारे उघडल्‍यात आली आहेत.

मंत्री शंभूराज देसाई यांच्‍या तालुक्‍यातच कृषी विभागातील ५० टक्‍के पदे रिक्‍त !

एकीकडे तरुणवर्ग नोकरीसाठी वणवण फिरतो आहे, तर दुसरीकडे पदे रिक्‍त रहात आहेत, हे अनाकलीन आणि गंभीर आहे. पदे रिक्‍त राहिल्‍यामुळे कामकाजावर होणार्‍या परिणामाचे दायित्‍व कुणाचे ?

राज्‍यातील शिक्षकांची रिक्‍त पदे ऑक्‍टोबर २०२३ पर्यंत भरण्‍यात येतील ! – शिक्षणमंत्री

केसरकर पुढे म्‍हणाले, ‘‘पवित्र प्रणालीपूर्वी पूर्वानुमती न घेता शिक्षकभरती केलेल्‍याची माहिती दिली जाईल. अधिकारी दोषी आढळल्‍यास कारवाई होईल.’’

अल्‍प होत असलेले वनक्षेत्र हे वन्‍य प्राण्‍यांच्‍या समस्‍येचे मूळ कारण ! – वनमंत्री

गाय, म्‍हैस, बैल आदींचा वन्‍य प्राण्‍यांच्‍या आक्रमणात मृत्‍यू झाल्‍यास देण्‍यात येणारे १० सहस्र रुपयांचे साहाय्‍य आता ७० सहस्र रुपयांपर्यंत करण्‍यात आले आहे.

पुण्‍यावर आतंकवादाचे सावट !

पुणे पोलिसांकडून ना बांगलादेशींवर गांभीर्याने कारवाई होत आहे, ना आतंकवाद्यांच्‍या साहाय्‍यकांवर. पोलीस प्रशासनाची घुसखोर बांगलादेशी आणि ‘स्‍लिपर सेल’ यांच्‍याविषयीची निष्‍क्रीयता आणि उदासीनता, हीच याला मुख्‍य कारणीभूत आहे. विद्येचे माहेरघर आतंकवादाच्‍या सावटाखाली येऊ न देण्‍याचे आव्‍हान पोलीस पेलत आहे का ? याकडे गांभीर्याने पहावे लागेल !