शिक्षणावरील गुंतवणुकीच्या तुलनेत सामाजिक परतावा येत नाही ! – देवेंद्र फडणवीस

शिक्षणक्षेत्राविषयी उपमुख्यमंत्र्याची खंत !

श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई – शिक्षण व्यवस्थेमध्ये भरपूर पालट करावे लागतील. महाराष्ट्रात प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणावर आपण वर्षाला १ लाख कोटी रुपये व्यय करतो. इतका काही देशांचा अर्थसंकल्पही नाही. आपण शिक्षणावर एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करूनही त्या तुलनेत त्यातून सामाजिक परतावा येत नाही, अशी शिक्षणक्षेत्राविषयीची खंत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केली. २७ जुलै या दिवशी शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचाराविषयीच्या एका तारांकित प्रश्नावर बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी ही खंत व्यक्त केली.

संपादकीय भूमिका 

शिक्षणातून सामाजिक उपयोगता मिळण्यासाठी पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीऐवजी भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षणप्रणाली आणणे आवश्यक आहे !