‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट !

‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘मी भगवंताच्‍या दारी आलो आहे’, असे वाटले. माझे मन शुद्ध आणि प्रसन्‍न झाले.’

वीर सावरकर उवाच

परधर्म ज्‍या वेळी आपल्‍या स्‍वधर्माशी सहिष्‍णुतेने वागणारा असतो, त्‍या वेळी परधर्माशी आपण सहिष्‍णुतेने वागणे, हा सद़्‍गुण ठरू शकतो. तथापि जो परधर्म आपल्‍या स्‍वधर्माशी सहिष्‍णुतेने वागत नाही, अशा परधर्मास परधर्म सहिष्‍णुतेची व्‍याख्‍या लागू पडत नाही.

औरंगजेब आपला नेता कसा होऊ शकतो ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद (जिल्‍हा छत्रपती संभाजीनगर) येथे औरंगजेबाच्‍या कबरीवर फुले वाहिली. त्‍यांच्‍या या कृतीने वाईट वाटले. आम्‍ही कुठल्‍याही धर्माच्‍या विरोधात नाही; पण औरंगजेब आमचा नेता आणि आमचा राजा कसा होऊ शकतो ? आमचा राजा एकच आहे, तो म्‍हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय, असे प्रतिपादन राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ जून या दिवशी येथे आयोजित केलेल्‍या जाहीर सभेत केले.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या तिसर्‍या दिवसातील पहिल्‍या सत्रातील मान्‍यवरांचे सूक्ष्म परीक्षण

 ‘१८ जून या दिवशी रामनाथ देवस्‍थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त वक्‍त्‍यांनी मार्गदर्शन केले. त्‍या वेळी देवाने आमच्‍याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेल्‍या धर्मध्‍वजाच्‍या पूजनाचे सूक्ष्म परीक्षण !

या धर्मध्‍वजाचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे ध्‍वजाच्‍या एका बाजूला सिंहासनावर आरूढ असलेली प्रभु श्रीरामाची आकृती आहे आणि ध्‍वजाच्‍या दुसर्‍या बाजूला प्रभु श्रीराम रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आकृती आहे. ही धर्मध्‍वजावरील वैशिष्‍ट्यपूर्ण रचना तमिळनाडू येथील नाडीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍या माध्‍यमातून महर्षींच्‍या आज्ञेनुसार केलेली आहे.

पुरी, ओडिशा येथे आषाढ शुक्ल पक्ष द्वितीयेपासून आरंभ झालेल्या श्रीजगन्नाथ रथयात्रेचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

भगवान श्रीकृष्‍ण श्री जगन्‍नाथाच्‍या रूपात विराजमान आहेत. त्‍यांच्‍या समवेत त्‍यांचा मोठा भाऊ ‘बलभद्र’ म्‍हणजे ‘बलराम’ आणि बहीण  ‘सुभद्रा’ यांचीही येथे पूजा केली जाते. वर्ष २०२२ मध्‍ये झालेल्‍या रथयात्रेचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत.

बेंगळुरू येथील उद्योगपती श्री. जयराम एस्. (वय ७६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

साधनेची तळमळ, संतांविषयी अपार भाव, आज्ञापालन करणे असे अनेक दैवी गुण लाभलेले मूळचे बेंगळुरू येथील उद्योगपती श्री. जयराम एस्. यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठली असून ते जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यातून मुक्‍त झाले आहेत, असे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी एका सत्‍संगात घोषित केले.

व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेण्‍याच्‍या माध्‍यमातून साधकांना साधनेत साहाय्‍य करणार्‍या ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. स्‍वाती संदीप शिंदे (वय ३६ वर्षे) !

आषाढ शुक्‍ल द्वितीया (२०.६.२०२३) या दिवशी ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. स्‍वाती संदीप शिंदे यांचा ३६ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त साधकांच्‍या लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव सोहळा पहातांना भगवान श्रीकृष्‍ण अर्जुनाला गीता सांगत असतांनाचा प्रसंग आठवून भावजागृती होणे

‘११ मे २०२३ या दिवशी झालेला सच्‍चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव सोहळा ‘याची देही याची डोळा’ पहायला मिळणार; म्‍हणून पुष्‍कळ आनंद होत होता. सोहळ्‍यासाठी येणार्‍या साधकांची परात्‍पर गुरु डॉक्‍टर आठवले किती काळजी घेत आहेत ! हे साधकांसाठी सिद्ध केलेल्‍या बैठकव्‍यवस्‍थेच्‍या माध्‍यमातून कळल्‍यामुळे त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञतेचा भाव दाटून येत होता.

धाराशिव येथे काम करून घेऊन कामगारांना डांबून ठेवणार्‍या ३ ठेकेदारांना पोलीस कोठडी !

धाराशिव तालुक्‍यातील वाखरवाडी आणि कळंब तालुक्‍यातील खामसवाडी येथे विहिरीवर काम करण्‍यासाठी परजिल्‍ह्यातील ११ कामगारांना बळजोरीने डांबून ठेवणार्‍या कृष्‍णा शिंदे, संतोष जाधव आणि रणजित साबळे या ३ ठेकेदारांवर ढोकी पोलिसांनी गुन्‍हा नोंद करून अटक केली होती. तिघांनाही न्‍यायालयासमोर उपस्‍थित केले असता त्‍यांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे.