‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट !

१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन (वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव) चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम
डावीकडून चेन्‍नई (तमिळनाडू) येथील ‘पी. गुरुज तमिळ वाहिनीचे निवेदक श्री. जी. जयकृष्‍णन् यांना आश्रमाच्‍या स्‍वागतकक्षातील श्रीकृष्‍णाच्‍या चित्राची माहिती सांगताना श्री. योगेश गंद्रे

डावीकडून ओडिशा येथील श्री. कपिलेश्‍वर मिश्रा यांना सात्त्विक कलाकृतींची माहिती सांगतांना साधक श्री. निषाद देशमुख
डावीकडून ‘हिंदु पुत्र’ संघटनेचे बिहार प्रदेशाध्‍यक्ष श्री. अविनाशकुमार बादल यांना ध्‍यानमंदिरातील देवतांची माहिती सांगतांना साधिका सौ. मंगला मराठे

अभिप्राय

मी भगवंताच्‍या दारी आलो आहे !

‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘मी भगवंताच्‍या दारी आलो आहे’, असे वाटले. माझे मन शुद्ध आणि प्रसन्‍न झाले.’

– श्री. राजेंद्र मधुकर भावसार, धुळे, महाराष्‍ट्र.  (१५.६.२०२३)