‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या तिसर्‍या दिवसातील पहिल्‍या सत्रातील मान्‍यवरांचे सूक्ष्म परीक्षण

‘१८ जून या दिवशी रामनाथ देवस्‍थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त वक्‍त्‍यांनी मार्गदर्शन केले. त्‍या वेळी देवाने आमच्‍याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

श्री. राम होनप                          श्री. निषाद देशमुख                     कु. मधुरा भोसले

१. डॉ. अमित थडानी, शल्‍य चिकित्‍सक, समाजसेवक आणि लेखक, मुंबई

डॉ. अमित थडानी

अ. डॉ. थडानी यांच्‍यात धर्मनिष्‍ठा, तळमळ आणि जिज्ञासा आहे.

अर. त्‍यांनी सर्व सूत्रे क्षात्रभावाने मांडल्‍यामुळे श्रोत्‍यांमधील धर्मरक्षणाची तळमळ जागृत होत होती.

आ. डॉ. थडानी यांनी ‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ या ग्रंथ निर्मितीसाठी केलेल्‍या संशोधनासाठी त्‍यांचे तन, मन, धन, बुद्धी आणि वेळ यांचा त्‍याग केला. त्‍यातून साधना होऊन त्‍यांच्‍या आध्‍यात्मिक क्षमतेत वाढ झाली.

२. अधिवक्‍ता कृष्‍णामूर्ती पी., कोडागू, कर्नाटक

अधिवक्‍ता कृष्‍णामूर्ती पी

अ. अधिवक्‍ता कृष्‍णामूर्ती यांच्‍यात धर्मनिष्‍ठा आणि धर्मकार्य करण्‍याची तळमळ यांमुळे निर्भयता अन् विवेक हे गुण आहेत, तसेच त्‍यांचे मन आणि बुद्धी स्‍थिर आहे. नामजपातील चैतन्‍याची अनुभूती आणि धर्मकार्य करतांना त्‍यांनी देवाचे साहाय्‍य अनुभवले आहे.

आ. त्‍यांच्‍यात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती पुष्‍कळ भाव आहे. त्‍यामुळे त्‍यांना देवाचे साहाय्‍य प्राप्‍त होऊन त्‍यांच्‍या हातून धर्मकार्य प्रभावीपणे होत असते.

इ. साधनेतील तेजामुळे ते ‘साधक-अधिवक्‍ता’ झाले आहेत आणि त्‍यांची ‘संत-अधिवक्‍ता’ या दिशेनेे वाटचाल होत आहे.

३. अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर, मुंबई उच्‍च न्‍यायालय, मुंबई

अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर

अ. अधिवक्‍ता पुनाळेकर हे हिंदु धर्मयोद्धा आहेत. त्‍यांच्‍यामध्‍ये धर्मासाठी सर्वस्‍वाचा त्‍याग करणे, धर्माप्रती निस्‍सीम भाव आणि प्रखर क्षात्रतेज आहे. त्‍यांच्‍यात हिंदुत्‍वासाठी तन, मन, धन आणि प्रसंगी प्राणत्‍याग करण्‍याची वृत्ती आहे. त्‍यामुळे त्‍यांचे भाषण ऐकतांना श्रोत्‍यांमध्‍ये हिंदुत्‍वासाठी संघर्ष करण्‍याची इच्‍छा निर्माण होते.

आ. प्रतिकूल परिस्‍थितीमध्‍ये राहूनही धर्मनिष्‍ठेमुळे ते अविरत न्‍यायालयीन संघर्ष करत आहेत. त्‍यामुळे त्‍यांची तपोसाधना होत आहे. परिणामी त्‍यांचा आध्‍यात्मिक विकास होत आहे.

४. पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन, अधिवक्‍ता, सर्वोच्‍च न्‍यायालय

पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन

अ. पू. जैन काळानुसार योग्‍य मार्गदर्शन करत असल्‍यामुळे त्‍याचा परिणाम थेट श्रोत्‍यांच्‍या अंतर्मनावर होत होता. परिणामी श्रोत्‍यांना हिंदु राष्‍ट्राच्‍या कार्यासाठी उत्‍साह आणि आध्‍यात्मिक बळ प्राप्‍त होत होते.

आ. पू. हरिशंकर जैन यांच्‍यात ५० टक्‍के क्षात्रतेज आणि ५० टक्‍के ब्राह्मतेज आहे, तसेच त्‍यांच्‍यात हिंदु बांधवांविषयी प्रीती आणि हिंदुत्‍वासाठी त्‍याग करणार्‍यांप्रती असीम आदरभाव अन् कृतज्ञताभाव आहे.

५. अधिवक्‍ता श्रीधर पोतराजू, सर्वोच्‍च न्‍यायालय, देहली.

अधिवक्‍ता श्रीधर पोतराजू

अ. अधिवक्‍ता पोतराजू यांच्‍यात जिज्ञासा, तळमळ आणि अभ्‍यास करण्‍याची वृत्ती आहे. त्‍यामुळे त्‍यांची बुद्धी सात्त्विक होऊन त्‍यांच्‍यात आध्‍यात्मिक दृष्‍टीकोन निर्माण झाले आहेत.

आ. अधिवक्‍ता पोतराजू यांच्‍यात शिकण्‍याची वृत्ती असल्‍यामुळे ते विविध प्रसंग आणि व्‍यक्‍ती यांच्‍याकडून धर्माची शिकवण आत्‍मसात करतात.’

– श्री. राम होनप, कु. मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) आणि श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के)  (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०२३)

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.