हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच गोहत्या संपूर्णपणे थांबतील !  – अधिवक्त्या सिद्ध विद्या, उच्च न्यायालय, मुंबई

भारतात विविध राज्यांमध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदे बनवण्यात आले आहेत. त्यांमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे ती हिंदूंशी एकप्रकारे केलेली प्रतारणा आहे. एका राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा असतांना त्याच्या शेजारच्या राज्यात गोहत्याबंदी कायदा नसेल, तर व्यापारी राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन गोहत्या करतात.

प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहून साधना करावी ! – पू. प्रदीप खेमका, धर्मप्रचारक, सनातन संस्था (झारखंड)

कोरोनाच्या काळात माझा व्यवसाय व्यवस्थित चालत होता. माझ्या कोणत्याही कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली नाही. अशा विविध प्रसंगांत मी साधनेमध्ये खरोखर शक्ती असल्याचे अनुभवले. साधनेचे बळ अतिशय प्रभावी आहे.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणार्‍यांनाच वर्ष २०२४ मध्ये मतदान करू ! – अजित सिंह बग्गा, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, व्यापार मंडल आणि अध्यक्ष, वाराणसी व्यापार मंडल

औरंगजेबाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. मंदिरे तोडून मशिदी उभारल्या. औरंगजेबाने पाडलेली मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आहेत. ही सर्व मंदिरे न्यायालयीन लढ्याने, आंदोलन करून किंवा प्रसंगी हौतात्म्य पत्करूनही पुनर्स्थापित केल्याविना आम्ही रहाणार नाही.

‘हेट स्पीच’चा बडगा धर्मांध आणि जिहादचे आवाहन करणार्‍या पुस्तकांवर कधी उगारणार !

‘हेट स्पीच’चा बडगा हिंदूंवर उगारला जातो. हिंदूंवर निर्बंध आणून त्यांच्यावर खटले प्रविष्ट केले जातात. ‘हेट स्पीच’ मध्ये अडकवून हिंदूंचे दमन केले जाते. असे असेल, तर ‘धर्मांध’ आणि जिहादचे आव्हान करणार्‍या पुस्तकांवर कधी कारवाई केली जाणार ?

‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद पुढील आठवड्याभरात पालटणार !

वास्तविक आक्षेपार्ह संवाद हटवले जाईपर्यंत या चित्रपटाचे प्रदर्शन रोखणे आवश्यक आहे. आजकाल बहुतांश चित्रपट ८-१५ दिवसांतच जुने होत असल्याने आक्षेपार्ह संवाद आठवड्याभरात काढण्याचे आश्‍वासन देणे, म्हणजे वेळ मारून नेण्यासारखे आहे ! ही हिंदूंच्या डोळ्यांत निवळ धूळफेक आहे !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मान्यवरांचा गौरव !

श्री अंजनेश्वर मंदिराचे महंत पू. विद्यादास महाराज यांनी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा मारुतीरायांची प्रतिमा देऊन सत्कार केला.

युगांडामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी शाळेवर केलेल्या आक्रमणात ४० जण ठार !

जगभरात इस्लामच्या नावाखाली जिहादी आतंकवादी कारवाया केल्या जातात; मात्र इस्लामी संघटना आणि त्यांचे धर्मगुरू कधीच त्यांचा विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !

भारतीय दांपत्याकडे त्यांच्या सवादोन वर्षांच्या मुलीला सोपवण्यास जर्मनीतील न्यायालयाचा  नकार !

बर्लिन येथील न्यायालयाने भारतीय दांपत्याची २ वर्षे ३ मासांच्या मुलीला तिच्या पालकांकडे सुपुर्द करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने या मुलीचे संगोपन करण्याचे दायित्व ‘जर्मनी युथ वेलफेअर कार्यालया’वर सोपवले आहे. वर्ष २०२१ पासून ही मुलगी सरकारच्या नियंत्रणात आहे.

शिमला (हिमाचल प्रदेश) येथील जैन मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

देशभरातील सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक आहे. मंदिर समिती, प्रशासन आणि भाविक यांनी यासाठी प्रयत्न करावेत !

बंगालमध्ये केंद्रीय मंत्री निशिथ प्रमाणिक यांच्या ताफ्यावर आक्रमण

बंगालमध्ये पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून तेथे हिंसाचार चालू झाला आहे. १७ जून या दिवशी केंद्रीय मंत्री निशिथ प्रमाणिक यांच्या वाहनाच्या ताफ्यावर आक्रमण करण्यात आले.