‘हेट स्पीच’चा बडगा धर्मांध आणि जिहादचे आवाहन करणार्‍या पुस्तकांवर कधी उगारणार !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये ‘हेट स्पीच’चे षड्यंत्र’ या विषयावर परिसंवाद !

परिसंवादाच्या वेळी डावीकडून श्री. नरेंद्र सुर्वे, अधिवक्ता सुभाष झा, अधिवक्ता भरत देशमुख आणि अधिवक्ता घनश्याम उपाध्याय

फोंडा (गोवा), १८ जून (वार्ता.) – ‘हेट स्पीच’चा (द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याचा)  बडगा हिंदूंवर उगारला जातो. हिंदूंवर निर्बंध आणून त्यांच्यावर खटले प्रविष्ट केले जातात. ‘हेट स्पीच’ मध्ये अडकवून हिंदूंचे दमन केले जाते. असे असेल, तर ‘धर्मांध’ आणि जिहादचे आव्हान करणार्‍या पुस्तकांवर कधी कारवाई केली जाणार ?, असा प्रश्न १८ जून या दिवशी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हेस्ट स्पीच’चे षड्यंत्र’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये उपस्थित केला. या परिसंवादामध्ये मुंबई येथील उच्च आणि सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुभाष झा, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय आणि महाराष्ट्र अन् गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अधिवक्ता भरत देशमुख सहभागी झाले होते. या परिसंवादाचे संचालन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले.

जिहाद करायला सांगणार्‍या ‘हेट बूक’ वर कारवाई कधी होणार ? – अधिवक्ता सुभाष झा

अधिवक्ता सुभाष झा

कोणते वक्तव्य ‘हेटस्पीच’ आहे, याविषयी अद्याप कायदा करण्यात आलेला नाही. कायदा करणे हे संसदेचे काम आहे. न्यायव्यवस्थेचे कार्य त्या कायद्यानुसार न्याय देणे हे आहे. काश्मीरमध्ये जेव्हा नरसंहार झाला, त्या वेळी ‘हेट स्पीच’ म्हणणारे कुठे होते ? बंगालमधून हिंदूंना षड्यंत्रपूर्वक विस्थापित करण्यात येत आहे. त्या वेळी ‘हेट स्पीच’ चे सूत्र उपस्थित केले जात नाही. ‘हेट स्पीच’ नुसार कारवाई होणार असेल, तर जिहाद करायला सांगणार्‍या ‘हेट बूक’ वर कारवाई कधी होणार ? भारत इस्लामी राष्ट्र होणे हिंदूंना मान्य आहे का ? नसेल तर भारताला हिंदु राष्ट्र करण्याविना हिंदूंपुढे कोणताही पर्याय नाही. त्यामुळे भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी हिंदूंना दिवसरात्र एक करायला हवे.

‘हेटस्पीच’ नसेल, असे ओवैसी यांचे एकही भाषण मिळणार नाही ! – अधिवक्ता घनश्याम उपाध्याय

अधिवक्ता घनश्याम उपाध्याय

न्यायालयात हिंदुत्वनिष्ठांसाठी खटले लढवतांना आमच्याकडे जातीयवादी असल्याप्रमाणे पाहिले जाते. हिंदूविरोधी बोलले जाते, तेव्हा हिंदू पुढे येत नाहीत. याउलट अन्य धर्मीय स्वत:च्या धर्मासाठी त्वरित एकत्र येतात. ‘हेट स्पीच’ चे वक्तव्य हे तर धर्मांधांकडून केले जाते. ‘हेटस्पीच’ नसेल, असे ओवैसी यांचे एकही भाषण मिळणार नाही. यासाठी हिंदूंनी संघटित होऊन धर्मकार्य करायला हवे.

हे पहा –

Vaishvik Hindu Rashtra Mahotsav | Day 3 : Session 2 | Hindu Adhiveshan 2023

या वेळी अधिवक्ता भरत देशमुख यांनी ‘हेट स्पीच’ च्या माध्यमातून हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचे सांगितले.

अधिवक्ता भरत देशमुख