हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करणार्‍यांनो नामजप करा !

‘नामजपाने दैवी शक्तींचे साहाय्य लाभते. अळेर्जुन उत्तम धनुर्धर होताच; पण त्याचबरोबर तो श्रीकृष्णाचा भक्तही होता. बाण सोडतांना तो नेहमी श्रीकृष्णाचा नामजप करत असे. त्यामु त्याचे बाण आपोआप लक्ष्यवेधी होत असत. श्रीकृष्णाच्या नामजपामुळे अर्जुनाच्या मनातील लक्ष्यवेध घेण्याचा संकल्प सिद्ध होत असे.

मरणासन्न पुरोगामित्व आणि कोल्हापुरी हिंदुत्व !

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कोल्हापूर येथे माध्यम-घोषित कथित दंगलीची चर्चा आहे. यामध्ये पुरोगामित्वाचा फुटका ढोल बडवणारे आघाडीवर असले, तरी त्यांना तो बडवावा लागतो, यातूनच कोल्हापूरचे हिंदुत्वनिष्ठ स्वरूप स्पष्ट होत आहे. येथे पुरोगाम्यांना कळत नाही की, ‘कोल्हापूर पुरोगामी कि हिंदुत्ववादी ?

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

‘जगात एकही हिंदु राष्ट्र नाही’, याची माहिती देणारा फलक सभागृहाच्या प्रदर्शनात लावण्यात आला होता. यामध्ये जगातील मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध, तसेच अन्य धर्मीय राष्ट्रांची आकडेवारी देण्यात आली होती.

हिंदु राष्ट्राची संकल्पना : सनातन धर्मातील वैश्विक संस्कृती आणि विश्वदर्शन याचेच नाव !

सध्या रामनाथी (गोवा) येथील श्री रामनाथ देवस्थानामध्ये ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. १६ जून या दिवशी या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिदिन प्रार्थना करा !

१. हिंदूंनो, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज आदींप्रमाणे आदर्शरित्या राज्य करणार्‍या राज्यकर्त्यांचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होवो’, यासाठी प्रतिदिन प्रार्थना करा ! २. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उपक्रम किंवा आंदोलन होत असल्यास त्याच्या यशस्वितेसाठी उपास्यदेवतेला प्रार्थना करा.

हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे झालेले काही प्रातिनिधिक लाभ !

अनेक न्यायालयीन प्रक्रियांमध्ये धर्मरक्षणार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अधिवक्ते लाभले ! धर्मकार्य करणार्‍या धर्माभिमान्यांना साहाय्य करणारे उद्योगपती भेटले ! हिंदुद्रोही प्रसारमाध्यमांच्या विरोधात वैचारिक लढा देण्यास प्रारंभ झाला !

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तील पहिल्या दिवशी सहभागी मान्यवरांचे सूक्ष्म परीक्षण

‘१६.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वक्त्यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी देवाने आमच्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे. 

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य आणि विचार यांची ओळख करून देणारी ग्रंथमालिका !

‘संमोहन उपचारतज्ञ’ ते ‘परात्पर गुरु’ या पदापर्यंत पोहोचेपर्यंतचा प.पू. डॉ. आठवले यांचा अध्यात्ममार्गावरील प्रवास, त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, त्यांचे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून चालू असलेले अद्वितीय आध्यात्मिक संशोधन, तसेच त्यांचे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य अन् विचार यांची माहिती सांगणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी दिलेला संदेश !

‘सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपण सर्वांनी कसे प्रयत्न करायचे ? परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी श्रद्धा आणि भाव कसा ठेवायचा ?’, या संदर्भात हिंदी भाषेत ध्वनीमुद्रण (ऑडिओ रेकॉर्डिंग) केले आहे.