युगांडामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी शाळेवर केलेल्या आक्रमणात ४० जण ठार !

कांपाल (युगांडा) – आफ्रिका खंडातील युगांडा या देशामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी एका शाळेवर केलेल्या आक्रमणात ४० जण ठार झाले, तर ८ जण गंभीररित्या घायाळ झाले. मपोंडवे या शहरातील लुबिरिहा या माध्यमिक शाळेवर हे आक्रमण करण्यात आले. आतंकवाद्यांनी येथे आगही लावली. हे आक्रमण ‘एलाइड डेमोक्रेटिक फोर्सेस’ नावाच्या आतंकवादी संघटनेने केले. ही आफ्रिकेतील इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेची शाखा आहे.

संपादकीय भूमिका 

जगभरात इस्लामच्या नावाखाली जिहादी आतंकवादी कारवाया केल्या जातात; मात्र इस्लामी संघटना आणि त्यांचे धर्मगुरू कधीच त्यांचा विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !