पुणे येथील वेताळ टेकडी टिकली पाहिजे ! – आदित्य ठाकरे

पुणे दौर्‍यावर असतांना आदित्य ठाकरे यांनी वेताळ टेकडीची पहाणी केली

जालना येथे ३ वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ५ सहस्र ५०० जणांचे लचके तोडले !

शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे वावरणारी मोकाट कुत्री वाहनचालकांच्या अंगावर येतात. ये-जा करणार्‍या नागरिकांसह शाळेत जाणार्‍या लहान मुलांच्याही पाठीमागे लागतात. शहरात मोकाट कुत्र्यांनी प्रतिदिन ६ ते ११ जणांचा चावा घेतल्याच्या घटना घडत आहेत.

गेल्या ५ मासांत नाशिक येथून ९५६ मुली आणि महिला बेपत्ता !

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध करू पहाणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? या विषयाकडे आताच गांभीर्याने पहायला हवे, अन्यथा ‘द महाराष्ट्र स्टोरी’ काढायला वेळ लागणार नाही !

(म्हणे) ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जावईशोध ! चित्रपटाच्या माध्यमातून हिंदु समाज ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जागृत होणे हे जितेंद्र आव्हाड यांना खुपत असल्याने ते चित्रपटाला खोटे ठरवण्याचा आटापिटा करत आहेत.

शासकीय योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत रहा ! – अजयकुमार मिश्रा, केंद्रीय गृह राज्यमंत्री

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा मंत्री मिश्रा यांनी घेतला. तेव्हा ते बोलत होते.

इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई आक्रमणात १२ जण ठार

मृतांमध्ये जिहादी संघटनेचे ३ प्रमुख कमांडर आणि त्यांचे कुटुंबीय यांचा समावेश आहे.

बेंगळुरू (कर्नाटक) येथे निवडणूक आयोगाने बजरंग दल आणि विहिंप यांना हनुमान चालिसाचे पठण करण्यापासून रोखले !

कलम १४४ लागू असल्याचे दिले कारण !

सातारा-जावळी प्रांताधिकारीपदी सुधाकर भोसले यांची नियुक्ती !

राज्यातील उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांचे स्थानांतर महसूल आणि वन विभागाने केले आहे. सातारा अन् जावळीच्या प्रांताधिकारीपदी सुधाकर भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशमध्ये बस नदीत कोसळल्याने २२ प्रवाशांचा मृत्यू  

यात ३ मुले आणि ९ महिला यांचा समावेश आहे. या अपघातात ३० जण घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.