सातारा-जावळी प्रांताधिकारीपदी सुधाकर भोसले यांची नियुक्ती !

सुधाकर भोसले (डावीकडे )

सातारा,  ९ मे (वार्ता.) – राज्यातील उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांचे स्थानांतर महसूल आणि वन विभागाने केले आहे. सातारा अन् जावळीच्या प्रांताधिकारीपदी सुधाकर भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांचे स्थानांतर झाल्यानंतर त्यांच्या जागी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील श्रीगोंदा येथील सुधाकर भोसले यांची नियुक्ती महसूल विभागाने केली आहे.

कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची सांगली जिल्ह्यातील मिरज येथे प्रांताधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. सातारा येथील उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) म्हणून काम केलेले श्रीमंत पाटोळे यांची महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ येथे महाव्यवस्थापकपदी (नवीन नगरे) स्थानांतर करण्यात आले आहे, तसेच उपजिल्हाधिकारी आरती भोसले (महसूल) यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.